suicide1_20171132408

धक्कादायक ! मोहाली मधील बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

परीक्षेत ९ गुणांचा प्रश्न सुटला म्हणून मोहालीमधील करणवीर सिंह या बारावीच्या विद्यार्थ्यांने आत्महत्या केली आहे. भौतिकशास्त्राचा पेपर संपल्यानंतर बुधवारी त्यानं आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ‘तुमच्या इच्छा, तुमची स्वप्नं मी पूर्ण करू शकत नाही, त्यामुळे मला माफ करा’ अशी सुसाईड नोटही त्याच्याजवळ कुटुंबियांना सापडली आहे. करणवीर हा हुशार विद्यार्थी होता. पूर्व परीक्षेत त्याला […]

Continue Reading
hsc-board-examination-2017_d3baf8d0-023f-11e7-b1f1-d4c6cd13dfb1

बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे

बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.राज्यातील बारावी परीक्षेच्या पेपर तपासणीवर शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या आश्वासनानंतर बहिष्कार मागे घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता. मागण्यांबाबत शासकीय आदेश दिल्यामुळे या क्षणापासून आंदोलन मागे घेत असल्याचे शिक्षक महासंघाने जाहीर केले. मुख्यमंत्र्यांनी […]

Continue Reading
students

बारावीचे ६५ लाख पेपर तापसणीशिवाय पडून का आहेत ?

बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीला सुरु झाली असून अद्याप एकही पेपर महविद्यालयातील प्राध्यापकांनी तपासला नाही. त्यामुळे बारावीचे ६५ लाख पेपर तापसणीविना पडून आहेत.शासनाने मान्य केलेल्या मागण्यांचे आदेश न काढल्याने १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार आज सहाव्या दिवशीही सुरूच राहिल्यामुळे राज्यात आजपर्यंत एकही पेपर तपासण्यात आला नाही व पेपर तपासणीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या […]

Continue Reading
Students in exam hall at a college in Andheri  as HSC examination started on Tuesday. Express Photo by Santosh Parab. 28.02.2017. Mumbai.

बारावी परीक्षेतील इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट

बारावीच्या परीक्षेतील इंग्रजी विषयाचा पेपर पुन्हा घेण्यात येणार नसल्याचे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले. बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी प्रसारमाध्यमांना याबद्दलची माहिती दिली. . इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे फोटो तासाभरातच व्हायरल झाले होते.त्यानंतर इंग्रजीचा पेपर पुन्हा होणार का, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला […]

Continue Reading
35364642-Biharboardexams_6

राज्यात बारावीची परीक्षा आजपासून सुरु

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरू होत आहे. राज्यभरातून तब्बल १४ लाख ८५ हजार १३२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत.विद्यार्थ्यांना 11 वाजेपर्यंतच परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार आहे. अकरा वाजेनंतर आलेल्या विद्यार्थ्यांना अपवादात्मक परिस्थिती लक्षात घेऊनच परीक्षा केंद्रांत प्रवेश दिला जाईल अन्यथा प्रवेश नाकारला जाईल. असे मंडळाने स्पष्ट केले […]

Continue Reading
800px-NagpurBus

नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांचा संपाचं हत्यार, सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना

नागपूर महापालिकेच्या बस कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. याचा सर्वाधिक फटका बारावीच्या विद्यार्थ्यांना बसत आहे. कारण आजपासून राज्यभरात बारावीच्या परीक्षा सुरु होत आहेत.बारावीच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून दहा टक्के बस सुरु ठेवण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेने दिली आहे. मात्र संपूर्ण शहराचा विचार करता विद्यार्थ्यांची यामुळे प्रचंड गैरसोय होत आहे.बस कर्मचारी संपावर गेल्यामुळे रिक्षाचालकांकडून नागरिकांची […]

Continue Reading
_ff9d8c78-b858-11e6-b854-09f15e20805e

उद्यापासून बारावीची परीक्षा सुरु, राज्यातील 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी देणार परीक्षा

राज्यात बारावीच्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला उद्यापासून सुरुवात होणार आहे. पुण्यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. राज्यातील 14 लाख 85 हजार 132 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर संपूर्ण राज्यात 2 हजार 822 परीक्षा केंद्र आहेत. शिवाय उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांची अदलाबदल होऊ नये यासाठी सर्व […]

Continue Reading
SSC-HSC-exams

राज्यातील दहावी, बारावीच्या परिक्षांचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने वेळापत्रक जाहीर केलं असून, दहावीची परीक्षा १ मार्च २०१८ ते २४ मार्च २०१८ दरम्यान, तर बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०१८ ते २० मार्च २०१८ दरम्यान होणार आहे. फेब्रुवारी-मार्च २०१८ मध्ये परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मुंबई, कोकण, कोल्हापूर, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक […]

Continue Reading