मुंबई

f02bdfe2cae639d2bfece546a74776ec

आता एल्फिन्स्टन रोड नव्हे, ‘प्रभादेवी’ !

एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नामांतराची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बुधवारपासून प्रभादेवी होईल. १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून या नवीन नावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा, या मागणीसह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात […]

920x920

मुंबईतील ताडदेव भागात बहुमजली टॉवरमध्ये आग

मुंबईतील ताडदेव भागातील एका बहुमजली टॉवरमध्ये आग भडकली आहे. सोमवारी दुपारी वेलिंग्टन हाईटस या टॉवरच्या २७ व्या मजल्यावर आग लागल्याचे वृत्त आहे. मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत. वेलिंग्टन हाईटस ही ३४ मजली इमारत आहे. या आगीमध्ये कुठेही जिवीतहानी झाली नाही.

mumbai

मी मुंबईकर, माझा काय दोष ?

लहानपणी पाऊस पडला तर सर्वात जास्त मजा वाटायची कि आज शाळेला सुट्टी … मोठे झाल्यावर कॉलेजचे लेक्चर बंक करून मित्र मैत्रिणीनं सोबत समुद्र किनारी तुंबलेल्या पाण्यात मजा चालायची. नोकरीला लागल्यावर ऑफिसला अघोषित सुट्टी मिळते ज्यात कुटुंबासोबत मजा चालायची. परंतु आता पाऊस किंवा पावसाळा हा ऋतू .. ऋतुचक्रातून निघून जावा किंवा नसावा असे वाटायला लागलेय. तुम्ही […]

byculla

प्रभाकरनगर येथील नादुरुस्त इमारतींची मधु चव्हाण यांनी केली पाहणी

भायखळा  – काँग्रेस आपल्या दारी या जनसंपर्क अभियानांतर्गत भायखळा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार मधु उर्फ अण्णा चव्हाण यांनी भायखळा विधानसभेतील प्रभाकरनगर-संघर्षसदन येथील नादुरुस्त PMGP इमारतींची पाहणी केली. यावेळी त्यांनी ड्रेनेज लाईन व पाण्याची टाकी गळतीमुळे स्थानिक रहिवाशांना होणारा दुषित पाणी पुरवठा तसेच इमारतींची पुनर्बांधणी व अन्य समस्या जाणून घेऊन त्याविषयीचे योग्य ते मार्गदर्शन केले.

default

दुर्दैवी घटना ! जुहू समुद्रात पाच जण बुडाले, एकाला वाचवण्यात यश

मुंबईतील जुहू चौपाटीवर पाच जण बुडाले आहेत, ही घटना गुरुवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमाराची आहे. बुडालेल्यांपैकी तिघांना पाण्याबाहेर काढण्यात आलं असून यातील वसिम खान हा बचावला आहे तर नाझिर गाझी आणि आणखी त्याच्या एका मित्राचा मृत्यू झाला आहे. त्याचं नाव अजून कळू शकलेलं नाहीये. हे सर्व तरुण अंधेरेतील डी.एन. नगरचे रहिवासी आहेत. इतरांचा शोध घेण्याचं […]

CBDT

जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेले त्रिकुट अटक

नोटबंदीच्या दोन वर्षांनंतरही बाजारात चलनात नसलेल्या काळ्या पैशांची चलती असल्याचे भिवंडी पोलिसांनी उघडकीस आणले आहे. गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलीस पथकाने ठाणे, कळवा येथे जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी आलेल्या त्रिकुटाला सापळा लावून अटक केली आहे. या त्रिकुटाकडून एक हजार व पाचशेच्या १ कोटी ६८ लाख ५० हजार रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत.

fyjc-1st-list_27752bf0-4867-11e6-9d20-c966aaf5b9b8

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. आज सकाळी ११ वाजता आर्टस् , कॉमर्स, सायन्स शाखांकरता ही यादी असेल. मुंबई डॉट इलेवनथ अॅडमिशन डॉट नेट या संकेतस्थळावर ही यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर ६ ते ९ जुलैदरम्यान महाविद्यालयात प्रवेश दिले जातील. यंदा एकुण २३११४० विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले असून मुलांचा सर्वाधिक कल […]

WR

पश्चिम रेल्वे वाहतूक मार्ग पूर्वपदावर

पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक आता पूर्वपदावर आली आहे. विरार आणि चर्चगेट दोन्ही दिशेने वाहतूक व्यवस्थित सुरु आहे. अंधेरीत रेल्वे रुळावरुन कोसळलेल्या पूलाचा ढिगारा हटवण्यात आला असून रात्री एकच्या सुमारास चर्चगेटच्या दिशेने अप धीमा मार्ग मार्गही पूर्ववत करण्यात आला. अंधेरीजवळ ट्रेनच्या वेगावर मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे लोकल काही मिनिट उशिराने धावत आहेत असे पश्चिम रेल्वेकडून […]

mumbai-0-0-1519878485

आम्हाला बुलेट ट्रेनची गरज नाही, आधी आहे ती लोकलसेवा सुरळीत करा – मुंबईकर

अंधेरी स्थानकातील रेल्वे रुळावर पादचारी पुलाचा भाग कोसळल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा वेगही बराच मंदावला आहे. दुसरीकडे हार्बर रेल्वेही स्लो झाली आहे. परिणामी सकाळीच कामासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचे प्रचंड हाल होत होतं. मिळेल त्या मार्गाने कार्यालय गाठण्यासाठी मुंबईकरांची धडपड सुरू होती.  मुंबईची लाइफलाइन असलेली लोकलसेवाच कोलमडल्यामुळे अनेक […]

2be463e029f0d3546b335830dc704c48

तब्बल सात तासांनी अंधेरीतून पहिली लोकल रवाना

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्टेशनवरचा पादचारी पूल कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर तब्बल सात तासांनी या स्टेशनमधून पहिली लोकल रवाना झाली. रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावर ही पहिली लोकल रवाना करण्यात आली आहे. परंतु, पश्चिम रेल्वे मार्गावरची वाहतूक मात्र अजूनही ठप्पच आहे. ही वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी अंधेरीत ओव्हरहेड वायर जोडण्याचं काम अद्यापही सुरू आहे. पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ […]

DhKOuM7VMAAl9BX

लोकलसेवा पूर्ववत होण्यास मध्यरात्र होणार

पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकाजवळ असलेल्या पुलाचा भाग रेल्वे रुळांवर कोसळल्याने रेल्वे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक खंडित झाल्याने ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, प्रशासनाकडून कोसळलेल्या पुलाचा ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. पश्चिम मार्गावरील अप आणि डाऊन जलदगती मार्गावरील लोकलसेवा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम […]

4f27309d39ebaf4b5c61eb59219f4d7b (1)

मुंबईत प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीपासून १ कोटी ९६ लाखांचा दंड वसुल

राज्यभरात प्लास्टिक बंदीचा निर्णय २३ जून पासून लागू करण्यात आला. तेव्हापासूनच हा निर्णय वादात आहे. प्लास्टिकचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला. तसेच प्लास्टिक वापरावर ५ हजारांपासून २५ हजारांपर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली. २३ जून ते २ जुलै या कालावधीत मुंबई महापालिकेने १ कोटी ९६ लाख ५ हजारांची दंड वसुली केली आहे. एवढेच […]

Screen-Shot-2016-03-25-at-8.36.40-am

कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडून पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू

देवनारमध्ये कचऱ्याच्या गाडीने पाच वर्षाच्या मुलाला चिरडलं असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मोहम्मद गौस दस्थगीर अहमद असे या मुलाचे नाव आहे. गोवंडीतील शिवाजीनगर भागात ही घटना घडली. शिवाजीनगरच्या प्लॉट क्रमांक 28 आणि 29 च्या मध्ये असलेल्या रस्ते क्रमांक 4 वर इथे आपल्या घरातून तो बहिणीसोबत बाहेर आला आणि अचानक समोरुन येणाऱ्या कचऱ्याच्या ट्रकखाली चिरडला गेला. […]

byculla madhu chavan

भायखळा येथे मधु चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न

भायखळा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधु चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक १ जुलै २०१८ रोजी भायखळा विधानसभा मतदार संघ जनसंपर्क कार्यालयात मतदार संघातील बुथ कमिटी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत मधु चव्हाण यांनी उपस्थित ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकत्यांना मार्गदर्शन केले.    

indu mill compound

इंदू मिल कंपाउंडच्या रहिवाश्यांनी मानले सोनम जामसुतकर यांचे आभार

नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या विशेष प्रयत्नातून अनेक वर्षांपासून भेडसावत असलेल्या इंदू मिल कंपाउंड मधील रहिवाश्यांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करून रहिवाश्यांना मुंबई महानगरपालिके तर्फे पिण्याच्या पाण्याची जल जोडणी करून दिली. सदर कार्यक्रमाच्या वेळी नगरसेविका सौ.सोनम जामसुतकर,माजी नगरसेवक श्री.मनोज जामसुतकर आणि स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. यावेळी, सर्व स्थानिक रहिवाश्यांनी सोनम जामसुतकर यांचे आभार मानले.

download (4)

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींना स्थान

मुंबईसाठी ही नक्कीच गौरवास्पद बाब ठरली आहे. मुंबईतील ब्रिटिशकालीन इमारतींना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे.‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशन पासून ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या अनेक इमारती ब्रिटीशकालीन आहेत. या इमारती आजही आपला दिमाख कायम राखत डौलदारपणे उभ्या आहेत आणि मुंबईच्या सौंदर्यात भर […]

road-accident

मुंबईत कार कंटेनरला धडकून दोघांचा मृत्यू

भांडुप उड्डाणपूलावर कार आणि कंटेनरची धडक होऊन या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. प्राथमिक अहवालानुसार कार चालकाचं नियंत्रण सुटल्याने दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातातील जखमींवर फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सकाळी 6:30 ते 6:45 च्या दरम्यान ही दुर्देवी घटना घडली. भांडुप उड्डाणपूलावर […]

download (1)

रेल्वे ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूकीवर परिणाम

ठाण्याच्या दिशेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तारांबळ उडली आहे. रेल्वे वाहतूक पुर्णपणे ठप्प झाली आहे. ही वाहतूक पूर्वपदावर येण्यास साधारण १ तास तरी जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूकीवर परिणाम झालाय. ठाणे-ऐरोलीदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने प्रवाशांचा घोळ झालाआहे. नेहमीप्रमाणे ऑफिसल्या जाणाऱ्यांची जास्त गर्दी नसली तरी मोठ्या प्रमाणात प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.

dinesh kadam

मनोज जामसुतकर यांनी घेतली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम यांची भेट

माजी नगरसेवक श्री.मनोज जामसुतकर यांनी भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री.दिनेश कदम यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. तद्प्रसंगी स्थानिक नगरसेविका सौ.सोनम जामसुतकर, माजी नगरसेवक श्री.सूर्यकांत पाटील  आणि काँग्रेस कार्यकर्ते श्री.सिंग उपस्थित होते.    

Untitled

घाटकोपर दुर्घटनेतलं आणि मुख्यमंत्र्यांचं ‘ते’ हेलिकॉप्टर एकाच कंपनीचं

घाटकोपर पश्चिमेकडील जीवदया लेन परिसरात भर वस्तीत रहिवाशी भागात चार्टर्ड विमान कोसळलं. या दुर्घटनेत एका पादचाऱ्यासह विमानातील चारही जणांचा मृत्यू झाला. दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. दुर्घटनाग्रस्त व्हीटी यूपीझेड, किंग एअर सी-90 हे चार्टर्ड विमान यूपी सरकारचं खासगी विमान होतं. मात्र हे विमान 2014 मध्ये यूपी सरकारकडून यूवाय एव्हिएशन या कंपनीने विकत घेतलं होतं. […]