कोकण

sarsoli-tournament

अकरा हजारापासून झालेली सुरुवात आज एक लाख अकरा हजारांच्या घरात. सारसोली चषकाची दमदार सुरुवात

गावपातळीवरील क्रिकेट स्पर्धेच्या वाढत्या गर्दीत रायगड जिल्ह्यातील सारसोली या गावाचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कारण, येथील सूत्रबद्ध पद्धतीने केलेले स्पर्धेचे नियोजन, शांतप्रिय वातावरणात राबविलेली तीन दिवसीय स्पर्धा आणि विशेष म्हणजे येथील तरुणांमध्ये असलेली एकता. आज याच कारणांमुळे सारसोली येथील क्रिकेट चषकाचा दर्जा उंचावत आहे. किंबहुना सारसोली गावाचा दर्जा उंचावत आहे. गावातील दिनेश पवार, महेश […]

dental department started

लाईफटाईम सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दंतचिकित्सा विभागाचा शुभारंभ

पडवे – कसाल येथील एसएसपीएम लाईफटाईम सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये दंतचिकित्सा विभागाचा शुभारंभ माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे व सौ. निलमताई राणे यांच्या हस्ते करण्यात आले.पडवे – कसाल येथील राणेंच्या सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आरोग्याच्या अनेक उपचार सुविधांबरोबरच दंतचिकित्सा विभाग मंगळवार पासून कार्यान्वित झाला आहे. यावेळी सुपरस्पेशालिटी हॉस्पीटलचे अधीक्षक डॉ. आर.एस. कुलकर्णी, सीईओ अगरवाल,सौ.पडते, दंतचिकित्सक विभागाचे डॉ.आशिष महामुनी,सिंधुदुर्ग जिल्हा […]

suicide-dh-1537532497

अलिबाग येथे इंजिनीयर विद्यार्थ्याची आत्महत्या

अलिबाग शहरातील शिवाजीनगर येथे ही घटना घडली. इंजिनीयर शिक्षण घेताना सतत नापास होण्याच्या नैराश्यातून तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सलील पाटील (20) वर्षे असे तरुणाचे नाव आहे. सलील पाटील हा पुणे येथे इंजिनीयरचे शिक्षण घेत होता. मात्र गेली दोन वर्षे तो सतत नापास होत होता, त्यामुळे तो नैराश्यात होता. दोन दिवसांपूर्वी सलील हा अलिबाग […]

maxresdefault

तेजस एक्प्रेसच्या धडकने तिघांचा जागीच मृत्यू

पनवेल ते पेण रेल्वे मार्गावर सध्या काम सुरू आहे. जिते येथेही काम सुरु असून त्यासाठी रेल्वेचे काही कंत्राटी कामगार रेल्वे रुळाजवळ काम करण्यासाठी आले आहेत. त्यापैकी काही कामगार रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास जिते गावात खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून ते परत येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना भरधाव वेगाने जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेसने अशोक बारे (३०), […]

CYMERA_20180511_163031

पेण शहरातील इमारतीचे सांडपाणी रस्त्यावर,रहिवाशांना नाहक त्रास

पेण शहरातील प्रभातनगर चिंचपाडा येथे नव्याने उभारण्यात आलेल्या सिद्धी समर्थ या सोसायटीचे सांडपाणी कोणतेही नियोजन न करता खड्डा खणून त्यात सोडले आहे. या विरोधात शेजारी असलेल्या जगदंब आशिष सोसायटीच्या सदस्यांनी पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून या इमारतीच्या बांधकाम व्यवसायिक व त्यांना ना हरकत दाखला देणाऱ्या नगरपालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. पेण चिंचपाडा […]

apoorva-thakur

अलिबाग अपूर्वा प्रविण ठाकूर ठरली मिस टिन इंडिया युनीव्हर्स विजेती

अलिबागची अपूर्वा प्रविण ठाकूर ही मुलगी दिल्ली येथील मिस टिन इंडिया युनीव्हर्स स्पर्धेमधील विजेती ठरली आहे.अपूर्वाची आता हिंदुस्थानतर्फे आंतरराष्ट्रीय सौन्दर्य स्पर्धेसाठीही निवड करण्यात आली आहे. देशभरातुन १६ ते १९ वयोगटातील शेकडो स्पर्धकांच्या विविध परिक्षा घेतल्यानंतर त्यामधून १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यांत आली होती. या दहा जणांमध्ये अनेक स्पर्धात्मक फे-या पार पडल्यानंतर परिक्षकांनी अपूर्वा प्रविण […]

681939-modinirav-041618

किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश

रायग़डच्या जिल्हाधिकाऱ्यांनी किहीम समुद्र किनाऱ्यावरील नीरव मोदीचा अनधिकृत बंगला पाडण्याचे आदेश दिले आहेत. नीरव मोदीचा अलिबागमधील किहीम गावात तर आवास गावात मेहुल चोक्सीचा बंगला आहे. महसूल आणि सीआरझेड कायद्याचे उल्लंघन हे बंगले उभारताना केले होते. मुंबई उच्च न्यायालयाने रायगड जिल्हाधिकाऱ्यांना १ ऑगस्टला अनधिकृत बांधकामांवर कायदेशीर कारवाई का केली नाही, असा सवाल केला होता. अलिबागमध्ये नीरव […]

kolegav-traning

कोळेगाव येथे नितीन पाटील यांच्या पुढाकाराने महिलांना कापडी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण

कोळेगाव प्रतिनिधी : सध्या दुष्काळामुळे  ग्रामीण भागातील युवा पिढी शहरांकडे वळत असताना आणि गावात रोजगारावाचून दररोजची होणारी महिलांची पायपीट बंद करून त्यांना घरखर्चासाठी आणि इतर खर्च भागवण्यासाठी आर्थिक मदत करण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजोक नितीन पाटील यांनी कोळेगावमधील नितीन पाटील युवा मंचाच्या साथीने त्यांच्या एस एन पी हँडीक्राफ्ट या कंपनीच्या माध्यमातून कोळेगाव येथील महिलांना […]

nitinpatil

नितीन पाटील यांनी केला जिल्हाधिकारी कार्यालयात तालुक्यातील रस्त्यांच्या अपघांताविषयी आरटीआय अर्ज

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील महूद-वेळापूर या खराब रस्त्यांमुळे वारंवार होणाऱ्या अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणारे आणि जखमी होणाऱ्या लोकांची संख्या वाढती आहे . गेल्या तीन वर्षांपासून प्रमुख महामार्ग असूनही हा रस्ता दुरुस्त करण्यात आला नाही . त्यामुळे अपघातातील जखमींचा आलेख वाढत आहे. तरीही प्रशासनाला जाग येईना, त्यामुळे कोळेगाव मधील रहिवासी असलेले एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख नितीन पाटील […]

nitinpatil

खराब रस्त्यांविषयी नितीन पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना ट्वीट

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगावचे रहिवासी असलेले एसएनपी सॉफ्टवेअरचे प्रमुख मा . नितीन पाटील यांनी तालुक्यातील खराब रस्त्यांची स्थिती राज्याचे मुख्यमंत्री मा . देवेंद्र फडणवीस व महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना ट्वीट करून त्यांच्या पुढे मांडली आहे . नितीन पाटील यांनी आपल्या ट्वीट मध्ये रस्त्यांची परस्थिती मांडताना ,’राज्यातील जनतेला मॅग्नेटीक […]

kolegoan-truck-accident

कोळेगाव मध्ये लोखंडी कॉईल घेऊन जाणारा ट्रक पलटला

कोळेगाव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये सांगोला अकलूज रोडवर काल दुपारी लोखंडी कॉईल घेऊन जाणाऱ्या ट्रक मधील लोखंडी कॉईल ला बांधलेली साखळी तुटून लोखंडी कॉईल एका बाजूवर झाल्याने ट्रक पलटला . मुंबईवरून आलेला हा ट्रक सांगोला अकलूज रोडवर आल्यांनतर या मार्गावरील खड्यांमुळे बांधलेल्या साखळीला हिसके बसून ती तुटल्यामुळे कोळेगाव मधील बस स्टॅन्ड च्या अवघे […]

dhwalsinh-mohite-patil

सभासदांचा पै ना पै दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही – डॉ धवलसिंह

माळशिरस : सभासदांचा कारखान्यावर विश्वास असून या सभासदांचा पै ना पै दिल्याशिवाय अंगावर गुलाल घेणार नाही असे प्रतिपादन डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी श्री.शंकर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रतापसिह मोहिते पाटील गटाचा प्रचाराच्या शुभारंभाचा नारळ माळशिरस येथील ग्रामदैवत मारुती मंदिरात फोडल्या नंतर श्री संत सावता माळी मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभेमध्ये बोलताना व्यक्त केले.यावेळी पद्मजादेवी […]

sureshprabhu

औद्योगिक प्रतिस्पर्धीपणाला प्रोत्साहन देण्यासाठी औद्योगिक पार्क रेटिंग सिस्टमची निर्मिती : सुरेश प्रभु

नवी दिल्ली: औद्योगिक पार्क रेटिंग प्रणालीचा विकास उद्योगातील स्पर्धात्मकता वाढवण्यास आणि उत्पादन क्षेत्राच्या वाढीस मदत होईल, असे वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभु यांनी सोमवारी सांगितले. अंतर्गत आणि औद्योगिक आधारभूत संरचना, कनेक्टिव्हिटी, पर्यावरण आणि सुरक्षा व्यवस्थापन आणि व्यावसायिक सहाय्य सेवा या चार खांबांवर आधारित औद्योगिक पार्कांचे मूल्यांकन करण्यासाठी मंत्रालयाने यंत्रणा विकसित केली आहे. प्रभु म्हणाले […]

images (1)

रायगड जिल्ह्यातील हा भाग होणार मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट

रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर तालुक्यांचा उर्वरित भाग,तसेच पालघर जिल्ह्यातील पालघर तालुका, वसई तालुक्यातील उर्वरित भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये समाविष्ट करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर मेट्रो मार्ग 10 – गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड), मेट्रो मार्ग 11 […]

nilesh-rane-malvan

“राणेंना” कार्यालयात येण्यास भाग पाडू नका – माजी खासदार निलेश राणेंचा मत्स्यव्यवसायला इशारा ,’ भ्रष्ट अधिकारी प्रदीप वस्तला कोणत्याही परिस्थितीत हटवणार’

मालवण : मत्स्यव्यवसाय विभागाच्या हातावर तुरी देऊन निसटलेल्या मलपी येथील ट्रॉलरला पळविण्यात हात असलेल्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या प्रदीप वस्त या अधिकाऱ्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या प्रकरणी पारंपरिक मच्छीमारांनी मंगळवारी माजी खासदार निलेश राणे यांची भेट घेऊन मत्स्यव्यवसाय विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईसाठी शासनाला भाग पाडणार असून आमदार नितेश राणे यांच्यामार्फत […]

nilesh-rane-social

निलेश राणेंचे सोशल मीडिया वरून कोळेगाव मधील युवकांच्या कार्याला समर्थन

कोळेगाव प्रतिनिधी  : नुकतेच माळशिरस तालुक्यातील कोळेगाव मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शाखेचे उदघाट्न झाले. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस माजी खासदार मा.निलेश राणे यांचे जवळचे सहकारी असलेले एसएनपी सॉफ्टवेअर चे प्रमुख नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोळेगाव येथे त्यांच्या गावा मधील युवक वर्गाने या शाखेची स्थापना केली . गावाच्या विकासात हातभार लावणे आणि गावातील इतर समस्या सोडविण्याच्या […]

mumbai-congres-

मुंबई काँग्रेस कार्यालयात इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

मुंबई : देशाची पहिली महिला पंतप्रधान होण्याचा मान मिळवलेल्या स्व . इंदिराजी गांधी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त मुंबई काँग्रेसने काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले. या अभिवादन कार्यक्रमाला काँग्रेसचे माजी आमदार आणि मुंबई काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मधू चव्हाण साहेब आणि वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासमवेत अनेक नेते मंडळी आणि पक्ष […]

01

अंबरनाथ मध्ये होणार राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन

अंबरनाथ : अंबरनाथ येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये कोमसाप युवाशक्ती मंडळातर्फे येत्या ८ आणि ९ डिसेंबरला राज्यातील पहिले राज्यस्तरीय युवाशक्ती साहित्य संमेलन होणार आहे . राज्यातील साहित्य क्षेत्राचा विकास होण्याबरोबरच राज्यातील तरुण पिढी या क्षेत्राकडे आकर्षीत करण्याच्या मानस असल्याचे कोमसाप युवाशक्ती मंडळाचे कार्यकर्त्यांनी संवादात सांगितले . या साहित्य संमेलनात साहित्याची मेजवानी तर मिळणारच आहे त्याबरोबरीने तरुणांच्या […]

sonam-jamsutka-start-

नगरसेविका सोनम जामसुतकर यांनी केला लोकोपयोगी कामाचा शुभारंभ

मुंबई :काँग्रेसच्या विद्यमान नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांच्या पुढाकाराने प्रभाग क्रमांक २१० मध्ये काल दिनांक १८ नोव्हेंबर २०१८ रोजी सायं. ५. ३० वाजता विविध लोकोपयोगी कामांचा शुभारंभ करण्यात आला . जनतेला दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे सोनम जामसुतकर यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सांगितले . सायंकाळी झालेल्या या कार्यक्रमाला नगरसेविका सौ . […]

congress-melava

काँग्रेसचा भव्य कार्यकर्ता मेळावा झाला संपन्न

मुंबई : २०१९ मध्ये होण्याऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील काँग्रेसची मोट बांधण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसने घेतलेला दक्षिण मुंबई लोकसभेच्या भायखळा विधानसभा मतदार संघातील काँग्रेस बुथ अध्यक्ष,प्रतिनिधी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा काल प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्राचे मा.मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण तसेच मा.केंद्रीय राज्यमंत्री मिलींद देवरा यांच्या उपस्थितीत मा . आमदार मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. मेळाव्यास मा.आमदार […]