देश

297394-new100note

आता लवकरच चलनात येणार शंभर रुपयांची नवी नोट

नोट बंदीनंतर २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटात चलनात आल्या. त्यानंतर ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यात. आता १०० रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे. शंभर रुपयांची नवीन नोट चलनात आणणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आली आहे. ही नोट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. या नव्या नोटेचे फोटो […]

1

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर लवकरच होणार मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लवकरच मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फ्री वाय-फायचा लाभ घेता येणार आहे. लोकसभेत बुधवारी (18 जुलै) एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी याबाबत माहिती दिली. वर्ष २०१६-१७मध्ये १००, २०१७-१८मध्ये २०० तर २०१८-१९ या वर्षात ५०० स्टेशनांवर वाय-फाय […]

DicNDpWWsAAfFQs

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,दहा जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत. ऋषिकेश-गंगोत्री महामार्गावरील सूर्यधर येथे हा अपघात झाला. गुरुवारी सकाळी उत्तराखंड परिवहन मंडळाची बस ऋषिकेश गंगोत्री महामार्गावरून जात असताना सूर्यधर येथे ही बस २५० मीटर खोल दरीत पडली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर ९ […]

297201-g-noida-3

उत्तर प्रदेशात दोन इमारती कोसळल्या; ३ ठार

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये एक चार मजली आणि दुसरी बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत कोसळली. शाहाबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशिराने हा अपघात झाला असून यामध्ये जवळपास ५० जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृतदेह हाती लागले असून यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. […]

alcohol

या राज्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्यास होणार दंड

पुढील महिन्यापासून गोव्यामध्ये कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना अथवा घाण करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. पर्रिकर म्हणाले, ”ऑगस्ट महिन्यापासून जर कोणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. जवळपास २५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. लवकरच त्यासाठी योग्य ती […]

8ce14dfceac87ad2e37e460428053bd4

नोटाबंदीच्या काळातला ओव्हरटाइम परत करा – स्टेट बँकेचा कर्मचाऱ्यांना फर्मान

नोटाबंदीच्या काळात बँकेच्या कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडला होता. या काळात कामाच्या वेळांव्यतिरिक्त केलेल्या या कामासाठी ओव्हरटाइम दिला जाईल असे व्यवस्थापनाने जाहीर केले होते. स्टेट बँकेच्या समूहातील स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर यांचा समावेश असून या कर्मचाऱ्यांना ओव्हरटाइम दिला. मात्र, आता या […]

suresh prabhu

अलौकिक व्यक्तिमत्वाचा वाढदिवस

आदरणीय सुरेशजी प्रभू यांचा आज वाढदिवस इतर राजकीय नेत्यांसारखे वाढदिवसाचे सवंग लोकप्रियतेसाठी कार्यक्रम प्रभुजींना कधीही मान्य नाहीत. गेली सुमारे २५ वर्ष विद्वत्तेच्या आणि वैचारिक प्रगल्भतेच्या संस्कारातुन सुरेशजींची सामाजिक व राजकीय कारकीर्द सुरु आहे. कोकणाने भारताला राष्ट्रीय स्थरावर अनेक नेतृत्व दिले, सुरेशजींची राजकीय व सामाजिक कारकीर्द सदैव दैदीप्यमान राहीली आहे. सारस्वत बँकेच्या अध्यक्ष पदाची धुरा अत्यंत […]

Rape_representation_1_0_0

धक्कादायक! अल्पवयीन विद्यार्थिनीने मुख्याध्यापकासह १८ जणांवर केला बलात्काराचा आरोप

बिहारच्या छपरा जिल्ह्यातील एका शाळेचे मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि शाळेतील अन्य १५ मुलांवर अल्पवयीन विद्य़ार्थिनीने बलात्काराचा अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आपल्यावर एकूण १८ जणांनी सहा महिने बलात्कार केला तसेच आपल्याला व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केले जात असल्याचा गंभीर आरोप या मुलीने केला आहे. परसागड गावातील दीपेश्वर बाल ग्यान निकेतन या शाळेत शिकणाऱ्या मुलीने शुक्रवारी पोलीस […]

2018_6image_16_52_00091400055-ll

‘जेईई’, ‘नीट’ची परीक्षा वर्षातून दोनदा

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

DJjBh5WU8AApDi4

उत्तर प्रदेश मध्ये प्लास्टीक बंदीचा आदेश जारी

महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला. प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिक बंदी घालण्यात आली. या पाठोपाठ आता उत्तर प्रदेशातही प्लास्टिकबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये 15 जुलैनंतर प्लास्टीक बंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात 15 जुलैनंतर प्लास्टीक कप, ग्लास आणि प्लास्टीक पिशव्यांचा वापर करु नये, असे आवाहन योगींनी उत्तर प्रदेशच्या जनतेला केले. त्यासाठी सर्वांनी एकत्र […]

TH08BRIEFLY1AGNS2Q3KDI3jpgjpg

जगन्नाथ पुरी मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा : सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने पुरी येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात सर्वधर्मीयांना प्रवेश द्यावा, असे निर्देश दिले असून दुसऱ्यांच्या आस्थेला धक्का पोहोचवण्यास हिंदुत्व सांगत नाही. त्याचबरोबर दुसऱ्या धर्मात हिंदू धर्म हा अडथळा आणत नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. जगन्नाथ मंदिराच्या आवारातील गैरव्यवहार आणि सेवकांकडून भाविकांना दिली जाणारी वागणूक यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी […]

kumar-1

मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने केली शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर

सत्तेवर येताच कर्नाटकातील जदयू-काँग्रेस आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पाळले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांना दोन लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर केली आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कुमारस्वामी सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केली असली तरी पेट्रोलच्या दरात १.१४ रुपये प्रतिलिटर तर डिझेलच्या दरात १.२० रुपये प्रतिलिटर वाढ केली आहे. म्हणजे राज्यात पेट्रोलच्या […]

Mercedez-Devrajan

एका शेतकऱ्याची स्वप्नपूर्ती : पहा किती वर्षांनी झाले मर्सिडिज विकत घेण्याचं स्वप्न

तामिळनाडूमधील एका शेतकऱ्याला आपलं स्वप्न पूर्ण होण्यासाठी वयाची तब्बल ८० वर्ष वाट पहावी लागली. ८८ वर्षीय देवराजन आज एका मर्सिडिज बेंझ बी-क्लास कारचे मालक आहेत. ८८ वर्षीय देवराजन यांचा हा प्रवास अगदी भावनिक आहे. मर्सिडिज बेंझ ट्रान्स कारने त्यांचा व्हिडीओ शूट करत हा प्रवास दाखवण्याच प्रयत्न केलाय. देवराजन जेव्हा फक्त आठ वर्षांचे होते तेव्हा त्यांनी […]

crime

धक्कादायक ! कापलेलं शिर घेऊन आरोपी गावात सैरावैरा पळत सुटला

झारखंडमधील सरायकेला खरसावां जिल्ह्यामध्ये अंगावर काटा आणणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सरकारी शाळेच्या परिसरात एका 50 वर्षीय शिक्षिकेचं शिर कापून हत्या करण्यात आली. यानंतर आरोपी ते कापलेलं शिर घेऊन गावात सैरावैरा पळत सुटला होता. आरोपीला अशा अवस्थेत पाहून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुकरू हेसा असे या शिक्षिकेचे नाव असून त्या विद्यार्थ्यांना फिजिकल […]

26207eb3d7d11a656b6ff9f5c3fcc1c1

१४ पिकांच्या हमीभावात भरघोस वाढ,मोदी सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूशखबर दिली आहे. अर्थसंकल्पातील घोषणेची अमंलबजावणी करत हमी भावाच्या ५० टक्क्यांहून अधिक दर देण्याच्या आश्वासनातंर्गत केंद्रीय कॅबिनेटने ही मंजुरी दिली आहे. सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांच्या हमीभावात दीडपटीने वाढ केली असून धानाच्या हमीभावात २०० रुपये प्रति क्विंटलने वाढवून तो १७५० रूपये क्विंटल इतके केले आहे. […]

amarnath-yatra

अमरनाथ यात्रा मार्गावर दरड कोसळल्याची घटना, पाच भाविकांचा मृत्यू

जम्मू-काश्‍मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे दरड कोसळल्याची घटना घडली. यात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर तिघं गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान बचाव पथक वेळीच पोचले असून जखमींवर उपचार सुरु आहेत. अमरनाथ यात्रा दरवर्षीप्रमाणे यंदाही 27 जूनला सुरू झाली. देशातील तब्बल 2 लाख भाविक या यात्रेत सहभागी झाले आहेत.जम्मू-कश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार […]

1515037396_3

धक्कादायक ! नदीत जीप कोसळून ६ भारतीय ठार

नेपाळमध्ये एक जीप नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात ६ भारतीयांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना भारताच्या सीमेजवळ नेपाळमधील सुनसरी जिल्ह्यात घडली. सोमवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या अपघातात जीप चालकासह इतर चार लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.जीपमध्ये प्रवास करणारे सर्व भारतीय हे बिहारमधील सुपोल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्व प्रवासी हे […]

rain-full

या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज – हवामान खाते

महाराष्ट्रासह देशातल्या बहुतेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका आहे.या आठवड्यात संपूर्ण देशभरात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला असून काही ठिकाणी तर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू काश्मीर, तामिळनाडू, आसाम, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश व गुजरातमध्ये काही अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर 17 दिवसांमध्ये पावसाने संपूर्ण भारत […]

download (2)

पॅन कार्डसोबत आजच लिंक करा आधार कार्ड

आज आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्याची शेवटची तारीख असून बँक ऑफ डायरेक्ट टॅक्सने पॅनकार्ड आधार कार्डला जोडण्याची मुदत आज संपणार आहे. ही मुदत आतापर्यंत चार वेळा वाढ करुन देण्यात आली होती. आधार कार्डला पॅन क्रमांक जोडणे सरकारने बंधनकारक केले असल्यामुळे तुम्ही अजूनही जर आधार कार्ड पॅनसोबत लिंक केले नसेल तर इतर कामे बाजूला ठेवून […]

download

काश्मीर खो-यात पूरस्थिती,अमरनाथ यात्रा स्थगित

जम्मू-काश्मीरमध्ये लागोपाठ दोन दिवस सुरू असलेल्या पावसानं झेलमसह इतर नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काश्मीर खो-यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. पूरस्थिती लक्षात घेता प्रशासनानं तिस-या दिवशीही अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे. तसेच काश्मीरमधील शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.झेलम नदी अनंतनाग जिल्ह्यातील संगम येथे शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता 21 फूट पाण्याच्या पातळीपर्यंत पोहोचली आहे. […]