शिक्षण

School-copy

रत्नागिरी जिल्ह्यातील जवळपास साडेसहाशे शाळा बंद करण्याचा सरकारचा घाट?

रत्नागिरी : कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळा बंद करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यालाही बसणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील सुमारे ६५० प्राथमिक शाळा चालू शैक्षणिक वर्षामध्ये बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या शाळा तातडीने बंद करण्यात येणार नसल्या, तरी कमी पटसंख्येच्या नावाखाली चालू शैक्षणिक वर्षात शेकडो शाळा बंद करून तेथील मुलांचे अन्य जवळच्या […]

CII

मा. सुरेशजी प्रभू यांच्या मार्गदर्शनाने व सीआयआय तर्फे कोकणामध्ये सुरु होणार कौशल्य प्रशिक्षण केंद्र व मॉडेल करिअर सेंटर

मा. ना. श्री. सुरेशजी प्रभू यांचे कोकणाच्या कृषी पर्यटन व कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अजून एक ठोस पाऊल कोकणातील कृषी पर्यटन कौशल्य प्रशिक्षण क्षेत्रात भारतातील नामांकित CII (Confederation of Indian Industry) या सर्व उद्योग समूहांची शिखर संघटनेच्या सहकार्याने कोकणात कौशल्य प्रशिक्षण व रोजगार मार्गदर्शन केंद्र स्थापन होणार आहे. मा. श्री. सुरेशजी प्रभू यांच्या […]

sindhudurg

सिंधुदुर्ग येथे आयआयटीटीएमची शाखा

नवी दिल्ली, 6 : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्यावतीने सिंधुदुर्ग-मालवण येथे पर्यटन व्यवस्थापनाचे शिक्षण देणा-या इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टूरीझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट(आयआयटीटीएम) ची शाखा उघडण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार) के. अल्फॉन्स यांनी केंद्रीय वाणिज्य व उद्योग तथा नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभु यांना पत्राद्वारे कळविले आहे. या निर्णयाबाबत श्री. प्रभु यांनी  श्री. अल्फॉन्स यांचे पत्राद्वारे आभार […]

Narayan Rane

यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याला माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे प्रमुख पाहुणे

मुंबई – युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने गतवर्षी प्रमाणे याही वर्षी केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. या सत्कार सोहळा आणि मार्गदर्शन कार्यक्रमाला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक – अध्यक्ष, खासदार श्री. नारायण राणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार […]

logo

युवा उत्थान फाऊंडेशन मार्फत यूपीएससी गुणवंत सत्कार सोहळ्याचे आयोजन

मुंबई – गतवर्षी प्रमाणे याही वर्षी युवा उत्थान फाऊंडेशन या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेमार्फत केंद्रीय नागरी सेवा परीक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या उमेदवारांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे. सदर सत्कार सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक १६ ऑगस्ट २०१८ रोजी सायं.४. ३० वाजता मुंबई – प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे होणार आहे. युवा उत्थान […]

2018_6image_16_52_00091400055-ll

‘जेईई’, ‘नीट’ची परीक्षा वर्षातून दोनदा

‘नीट’ आणि ‘जेईई’ची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याची महत्त्वपूर्ण घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली. या परीक्षा आता कॉम्प्यूटरवर घेतल्या जाणार असून जेईईची परीक्षा जानेवारी आणि मार्च तर ‘नीट’ची परीक्षा फेब्रुवारी आणि मे महिन्यात घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. Share on: WhatsApp

vrushant patil

लोणारेच्या वृषांत पाटीलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

अलिबाग तालुक्यातील लोणारे येथील रहिवाशी श्री. विश्वजित पाटील यांचा चिरंजीव कु. वृषांत पाटील याने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९४.६० टक्के मिळवून घवघवीत यश प्राप्त केले आहे. अलिबाग येथील कोकण एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत वृषांत दहावीचे शिक्षण घेत होता. इयत्ता पहिली पासून अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या वृषांतला आपण दहावीच्या परीक्षेतही नव्वदीचा आकडा पार करू असा दृढ आत्मविश्वास होता. […]

capture_2868570_835x547-m

CBSE 10th result 2018 : दुपारी 4 वा.

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. आज दुपारी 4 वाजता सीबीएसईच्या 10 वी च्या परीक्षेचा निकाल वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in. या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. यंदा सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षेला 10 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. त्यांचा आज निकाल […]

cbse

CBSE बोर्डाच्या दहावीच्या निकालाची तारीख जाहीर

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या दहावीच्या परिक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या दुपारी ४ वाजता सीबीएसईच्या १० वी च्या परिक्षेचा निकाल जाहीर होणार आहे. दोनच दिवसांपूर्वी सीबीएसईच्या १२ वीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. cbseresults.nic.in, cbse.nic.in and results.nic.in. या संकेतस्थळांवरही विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. Share on: WhatsApp

Alibag

आगरी विद्यानिधी समुह ,कातळपाडा-कुसुंबळे यांच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

अलिबाग – महाराष्ट्र दिनानिमीत्त ‘आगरी विद्यानिधी समुह , कातळपाडा-कुसुंबळे’ यांच्यावतीने कुसुंबळे ग्रामपंचायत क्षेञातिल इयत्ता १०वी व १२वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे गुणगौरव करण्यात आले. तसेच १ली ते ४थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या उजळणी (पाढे) पाठांतराच्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला . यावेळी आगरी विद्यानीधी समुहाचे अध्यक्ष श्री विष्णू नामदेव पाटील , श्री रविंद्र नामदेव पाटील […]

1f56394accbc79a636f81fa81f776719

अखेर मुंबई विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाले

रुईया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु म्हणून निवड झाली आहे.राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी डॉ.सुहास पेडणेकर यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नेमणूक केली. राज्यपालांनी आज (२७ एप्रिल) राजभवनात डॉ. सुहास पेडणेकर यांना नियुक्त पत्र सोपवलं. डॉ. पेडणेकर यांची नियुक्ती कुलगुरुपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी किंवा ते वयाची ६५ वर्षे पूर्ण करेपर्यंत […]

8150b2c47aa5e5c2969ed70034df19cb (1)

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन पद्धतीने : पंकजा मुंडे

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या यापुढे ऑनलाईन पद्धतीने होणार असल्याचे सांगितले. यामुळे पारदर्शकता राहण्यास मदत होईल, अशी माहिती ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. राज्य सरकारच्या २७ फेब्रुवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला असून आता शिक्षकांच्या बदल्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. या बदल्यांसाठी ऑनलाइन […]

chanel page

द युनिक अॅकॅडमीच्या युट्युब चॅनेलने एक लाख सब्सक्राइबरचा टप्पा ओलांडला. एक कोटीहुन जास्त हिट्स.

द युनिक अॅकॅडमी ही स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. ज्ञानातून सक्षमीकरण हे ब्रीद स्वीकारून युनिक अॅकॅडमीने स्थापनेपासूनच यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात आपला नवा ठसा उमटविला आहे. स्पर्धा परीक्षांच्या सर्वांगीण तयारीसाठी अभ्यासवर्ग हा युनिकचा महत्वाचा उपक्रम असून सविस्तर मार्गदर्शन, व्यक्तीगत लक्ष, परीक्षाभिमुख दृष्टीकोन, दर्जेदार व अद्ययावत नोट्स आणि भरपूर सराव चाचण्या […]

Vinod-Tawde-2-600x310

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार – शिक्षणमंत्री विनोद तावडे

दहावीच्या नव्या अभ्यासक्रमाचा फायदा विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी होणार आहे, असा विश्वास शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी व्यक्त केला.बालभारतीच्या दहावीच्या अभ्यासक्रमाच्या नवीन पाठयुपस्तकांसोबत उपलब्ध होणा-या भाषा आणि भाषेतर विषयाच्या स्वतंत्र मूल्यमापन पुस्तिकेमुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे करावे याचा तपशील समजणार आहे. दहावीच्या नव्या अभ्यासक्रमात नेमकं काय-काय नवीन आहे, याची उत्स्कुता विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक आणि पालकांनाही आहे. नव्या अभ्यासक्रमाची […]

dc-Cover-varlu2q16tv6d32b15eqdcbtl5-20160823134402.Medi

आता पालकांनाही खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार

खासगी शाळांच्या मनमानी फी वाढीविरोधात तक्रार करण्याचा अधिकार आता पालकांनाही मिळणार आहे. त्यामुळे कुठल्याही शाळेत २५ टक्के पालक एकत्र येऊन तक्रार करु शकतील.भाजप आमदार अतुल भातखळकर यांच्या लक्षवेधीवर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत घोषणा केली. शिक्षणाच्या व्यापारीकरणास शैक्षणिक संस्थांकडून भरमसाठ शुल्क आकारण्याची प्रथा व शैक्षणिक संस्थांच्या नफेखोरीस आळा घालण्यासाठी महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) लागू […]

prakash-javadekar759

यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या बंद केल्या जाणार – प्रकाश जावडेकर

यापुढे ज्या शाळा गुणवत्ता राखण्यात अपयशी ठरतील त्या बंद केल्या जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी केली. राज्य शासनापाठोपाठ केंद्रानेही गुणवत्तेच्या आधारावर शाळा बंद करणार आहे. त्यामुळे राज्यापाठोपाठ देशभर याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. आठव्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. राज्य शासनाने नुकतेच खालावलेली गुणवत्ता व […]

aditya

अवघ्या २१व्या वर्षी सीए, सीएस आणि सीएमए परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविला.

सुरतच्या आदित्य झावरने वयाच्या २१व्या वर्षीच सीए, सीएस आणि सीएमए परीक्षेत उत्तीर्ण होऊन विक्रम नोंदविला आहे. हि कामगिरी करणारा तो सर्वांत कमी वयाचा पहिला भारतीय ठरला आहे. आदित्य सुरतमधील सीए रवी छावछरिया यांच्याकडे प्रशिक्षण घेतो. त्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून (इग्नू) वाणिज्य शाखेची पदवी घेतली आहे. तो आता बी.कॉमच्या अंतिम वर्षाच्या निकालाच्या प्रतिक्षेत आहे. आदित्यचे […]

आगळा वेगळा वृक्षलागवड व वृक्षवाढदिवस कार्यक्रम संप्पन

पेण तालुक्यातील हमरापूर या छानश्या गावात अक्षर विद्यालय ही शाळा परिसरातील विद्यार्थी-विद्यार्थीनीना उत्तम संस्कार व शैक्षणिक अभ्यासक्रमासोबत व्यक्तिगत विकास व राष्ट्रीयत्वाच्या अभिनव संकल्पनेतुन, संस्थापक श्री. विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घडवित आहे. काल या विद्यालयात वृक्षलागवड व वृक्षवाढदिवस हा आगळा वेगळा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास मुख्य वनसंरक्षक श्री. लिमये, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष श्री. किशोर धारिया, […]

lspm

एल.एस पी.एम. कॉलेज चोंढी – अलिबाग येथे दीक्षांत समारंभ संपन्न.

एल.एस पी.एम. कॉलेज चोंढी – अलिबाग येथे दीक्षांत समारंभ संपन्न दि.२२ फेब्रुवारी २०१७ रोजी लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळाचे कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये दीक्षांत समारंभ संपन्न झाला. यावेळी गतवर्षी विद्यालयामध्ये उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. कला , वाणिज्य व विज्ञान शाखा मिळून एकूण ६० विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. गतवर्षी […]

LSPM Alibag

एल.एस. पी.एम .वरिष्ठ महाविद्यालय चोंढी अलिबाग “मराठी संवर्धन पंधरवडा” संपन्न .

दि . १ जानेवारी ते दि.१५ जानेवारी या दरम्यान एल.एस पी.एम. महाविद्यालयामध्ये “मराठी संवर्धन पंधरवडा” साजरा करण्यात आला . या निमित्ताने महाविद्यालयामध्ये कथा लेखन ,निबंध लेखन व काव्य लेखन , स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.  त्याचप्रमाणे २४ जानेवारी रोजी पारंपारिक नृत्य व लोकगीतांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भवन नृत्य ,पोवाडा, गोंधळ ,मंगळागौर ,लावणी इत्यादी सादर […]