7cd5dacd83d46993219ab4bc013fceea

आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्सस दाखवण्याची गरज नाही

तुम्हाला आता ट्रॅफिक पोलिसांना ड्रायव्हिंग लायन्ससची मूळ प्रत दाखविण्याची गरज राहणार नाही. केवळ मोबाईलमधील ई-कॉपी दाखवली तरी पुरेसे आहे. तसे निर्देशच केंद्र सरकारने राज्यांमधील ट्रॅफिक पोलिस व परिवहन विभागांना दिले आहेत. माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यामधील तरतुदींचा उल्लेख करत वाहतूक मंत्रालयाने ट्रॅफिक पोलीस आणि राज्यातील अन्य वाहतूक विभागांना आदेश दिला आहे की, ड्रायव्हिंग लायसन्स, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट […]

Continue Reading
Upper_Chorlton_Road_in_the_summer_rain

भारतात सरासरीच्या दहा टक्के कमी पाऊस

जून ते सप्टेंबर या महिन्यात ९७ टक्के पाऊस पडेल, असे भाकीत भारतीय हवामान खात्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला वर्तविले होते, तर स्कायमॅट या खासगी संस्थेनेही मोठा पाऊस पडेल, असा अंदाज दिला होता. त्यानंतर त्यांनी हे प्रमाण कमी केले. प्रत्यक्षात आता हा अंदाज देखील खोटा ठरत आहे. जूनमध्ये खूप पाऊस आला आणि १५ जुलैपासून पावसात जो खंड पडला […]

Continue Reading
evm-machine

आगामी सार्वत्रिक निडणुका ईव्हीएमद्वारेच – मुख्य निवडणूक आयुक्त

‘ईव्हीएम’बद्दल शंका घेतल्या जात आहेत, परंतु मतपत्रिकेद्वारे निवडणूक घेण्याचे फार चांगले परिणाम नाहीत. मतपत्रिकेने मतदान घेतल्याने लाखो मते अवैध ठरतात. यामुळे अत्यल्प मताधिक्क्याने उमेदवार विजयी होतात. अशाप्रकारे निवडून आलेले उमेदवार लोकांच्या आशा-आकांक्षावर खरे उतरण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे निवडणुकीशी संबंधित सर्व घटकांचे ई व्हीएम बाबतचे मत जाणून घेऊन, त्यांच्या शंकांचे निरसन केले जाईल. असे सांगून […]

Continue Reading
5b6894cc3a4e0.image

करुणानिधींच्या पार्थिवाचं मरीना बीचवरच होणार दफनविधी – मद्रास हायकोर्ट

तामिळनाडूचे मुख्यमंत्रीपद पाचवेळा भूषवणारे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे नेते तसंच द्रविड राजकारणाचे प्रणेते मुथुवेल करुणानिधी यांचे चेन्नई येथील कावेरी रुग्णालयात वयाच्या ९४ व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी निधन झाले. सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले. करुणानिधी यांचे पार्थिव बुधवारी सकाळी चेन्नईतील राजाजी हॉल येथे नेण्यात आले. राजाजी हॉल येथे कार्यकर्त्यांना पार्थिवाचे […]

Continue Reading
images

लखनौ मुसळधार पाऊसात चार इमारती जमीनदोस्त,तिघांचा मृत्यू

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौत मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे चार इमारती कोसळल्या असून या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे. लखनौच्या गणेशगंज, अमीनाबाद, हुसैनाबाद आणि उदयगंज या भागात ४ इमारती कोसळल्या असून अनेक जण जखमी झाले आहेत. अमीनागंजमध्ये एकाचा मृत्यू झाला असून हुसैनाबादमध्ये दोघांचा मृत्यू ओढवला आहे. लखनौमध्ये सकाळपासून पाऊस सुरू असल्याने गणेशगंज मध्ये एक इमारत कोसळली. […]

Continue Reading
jammu-kashmir-2-terrorist-killed-in-sopore-encounter-thepoliticalindia

जम्मू-काश्मीर सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरच्या सोपोर जिल्ह्यात सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. येथील दुर्सू या गावात हे दोघे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा रक्षकांना मिळाली होती. सोपोर जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना घेरले होते. त्यानंतर दोन्ही बाजूंनी फायरिंग झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा रक्षकांना यश आहे. यापूर्वी कुपवाडामध्ये गुरुवारी दहशतवादी […]

Continue Reading
sana-bihara

११० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या सनाची सुखरूप सुटका

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यामध्ये ११० फूट खोल बोअरवेलमध्ये अडकलेल्या तीन वर्षांच्या सनाला ३० तासांच्या अथक प्रयत्नानंतर सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. एनडीआरएफच्या पथकाने आणि लष्कराच्या जवानांनी तीन वर्षांच्या या चिमुकलीला अथक बचाव कार्यानंतर सुखरूपपणे बाहेर काढले आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. सनाला सुखरूप बाहेर काढल्यानंतर तिच्या आईने सर्वांचे आभार मानले. बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर लगेचच तिला […]

Continue Reading
aadhar-card

आधार क्रमांक सोशल मीडियावर शेअर करु नका : UIDAI

आधार क्रमांक सार्वजनिक करुन सोशल मीडियावर हॅकर्सना आव्हान देणं भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्राय (Trai) चे चेअरमन आर एस शर्मा यांच्या अंगलट आल्यानंतर UIDAI ला जाग आली आहे. कारण, कुणीही आपला आधार क्रमांक सोशल मीडियावर सार्वजनिक करु नका, असं आवाहन UIDAI कडून करण्यात आलं आहे. UIDAI कडून नागरिकांनी आपला १२ अंकी आधार क्रमांक इंटरनेट किंवा […]

Continue Reading
LPG-1-644x362-1

सर्वसामान्य नागरिकांना धक्का,घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ

महागाईने आधीच बेजार झालेल्या सर्वसामान्य नागरिकांना आणखी एक धक्का सरकारने दिला आहे.कारण विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीमध्ये ३५.५० पैशांची वाढ करण्यात आली आहे. तर घरगुती अनुदानित गॅस सिलेंडरही महाग झालं असून, १.७६ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. अनुदानित गॅस आज मध्यरात्रीपासून १.७६ रुपयांनी महाग झाला आहे. ४९६.२६ रुपयांवरून तो ४९८.०२ रुपये झाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने […]

Continue Reading
lok-sabha1

१२ वर्षांखालील मुलींवरली बलात्कार प्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा, लोकसभेत विधेयक मंजूर

१२ वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या चिमुरडींवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना मृत्यूदंडाची शिफारस करणारं फौजदारी कायदा दुरुस्ती विधेयक २०१८ लोकसभेत मंजूर झालं आहे. यामुळे लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांभोवती कायद्याचा फास आवळता येणं शक्य होणार आहे. लहान मुलींवर बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देण्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला होता. यानंतर सध्याच्या फौजदारी गुन्हा कायद्यात दुरुस्ती करण्याचे […]

Continue Reading