ratnagiri-sindhudurg

रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा

रत्नागिरी – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. या प्रचारा दरम्यान सर्वत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचीच जास्त चर्चा होत असताना दिसत आहे. मतदार संघातील एका तरुणाने अनोख्या पद्धतीने प्रचार करून निलेश राणे यांना पसंती दाखविली आहे. यात त्याने आपल्या राहत्या घराच्या दारावर स्वतःच्या हस्ताक्षरात एक नोटीस लावली […]

Continue Reading
joy bhosale

उत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज

मुंबई – वांद्रे पूर्व येथील स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.जॉय भोसले यांनी काल दिनांक ९ एप्रिल २०१९ ला उत्तर मध्य मुंबई या लोकसभा  मतदार संघातून आपल्या उमेदवारीचा अर्ज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. वांद्रे येथील शासकीय वसाहतीत लहानाच्या मोठ्या झालेल्या जॉय या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहेत. वांद्रे येथील स्थानिक […]

Continue Reading
FB_IMG_1548141811044

आमदार प्रविण दरेकर यांनी घेतली समाजकल्याण अधिकाऱ्यांची भेट

कांदिवली पूर्व नालंदा बुद्धविहार दामूनगर येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन उभरण्या संदर्भात जलद गतीने कार्यवाही व्हावी याकरिता भाजपा आमदार प्रविण दरेकर यांनी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंके यांच्या समवेत विविध विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली. तद्प्रसंगी समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंके, सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता […]

Continue Reading
local_train

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कामायनी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये उंबरमाळी स्थानकाजवळ बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी मध्य रेल्वेच्या कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. यामुळे खर्डी, आटगाव स्थानकाजवळ लोकल आणि काही लांबपल्ल्याच्या गाड्या रखडल्या आहेत. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून याची तातडीने दखल घेण्यात आली असून दुरुस्तीचे काम हाती […]

Continue Reading
pravin-darekar

मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे मार्गदर्शन शिबीर | आमदार प्रवीण दरेकर यांची प्रमुख उपस्थिती

मुंबई वार्ताहर – मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक व मुंबई डिस्ट्रिक्ट को. ऑप. हौसिंग फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शारदाआश्रम विद्यालय सभागृह, दादर येथे मार्गदर्शन शिबीर आयोजित केले होते. या मार्गदर्शन शिबिरा मध्ये मुंबै बॅंकेचे अध्यक्ष व आमदार प्रविण दरेकर यांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले. यावेळी मुंबै बॅंकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, नंदकुमार काटकर, जिजाबा पवार, जयश्री पांचाळ, […]

Continue Reading
1547468383-BEST_bus_strike_ANI

बेस्ट संप, मुंबईकरांची प्रचंड गैरसोय

बेस्टने मागील सहा दिवसांपासून संपाचे हत्यार उचलल्यामुळे मुंबईकरांची प्रचंड गैरसोय झाली आहे. संप मिटविण्यासाठी अनेक बैठका घेण्यात आल्या तरी, संपावर तोडगा निघू शकला नाही. बेस्ट उपक्रमाला वाचवण्यासाठी अंदाजे ९ हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. बेस्ट कर्मचारी गेले ५ दिवस संपावर असले तरी हे ९ हजार कोटी देण्याची किंवा त्यावर तोडगा काढण्याची तयारी महापालिका किंवा राज्य […]

Continue Reading
1547008567-BEST_strike_PTI

‘बेस्ट’ संप तिसऱ्या दिवशीही सुरुच,मुंबईकरांचे हाल

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप तिसऱ्या दिवशीही कायम असल्याने मुंबईकरांचे हाल सुरूच राहिले. उत्पन्न बुडाल्याने ‘बेस्ट’लाही या संपामुळे पाच ते सहा कोटींचा महसूली फटका बसला आहे. संपावर तोडगा निघाला नाही तर बेस्टच्या कार्यालयीन विभागातील कर्मचारीही संपावर जातील, असा इशारा देण्यात आला आहे. विविध मागण्यासंदर्भात बेस्ट कामगार संयुक्त कृती समितीने बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला सोमवारी […]

Continue Reading
images_1538024425999_mumbais_overcrowded_local_trains_have_lost_rs_3000_crore_in_3_years

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुंबईच्या हार्बर रेल्वे मार्गावरील खांदेश्वर-पनवेल रेल्वे स्थानकांदरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. दरम्यान दुरुस्तीकाम पूर्ण झाले असून या मार्गावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याचे ट्विटरवरून जाहीर करण्यात आले आहे. मात्र असे असले तरी गाड्यांची वाहतूक उशिराने सुरू असून पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही […]

Continue Reading
920x920

कांदिवली आग प्रकरण,आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू

कांदिवली पूर्वेकडील दामू नगरमधील कपड्याच्या कारखान्याला रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली होती. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवल्यानंतर चार जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीवर चार फायर इंजिन आणि चार जंबो वॉटर टँकर्सच्या मदतीने रात्री साडेदहाच्या सुमारास […]

Continue Reading
mumbai-andheri-hospital-fire_201812171884

मुंबईतील अंधेरी कामगार रुग्णालय, आगीतील मृतांचा आकडा वाढला

अंधेरी एमआयडीसी भागातील कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा वाढला असून आगीतील मृतांचा आकडा ९ वर गेला आहे. शीला मोरवेकर या महिलेचा मृत्यू झाला आहे. कामगार रूग्णालयाला सोमवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शिकस्त करत आटोक्यात आणली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याचं समजत आहे. आग लागल्यानंतर झालेला […]

Continue Reading