IMG_20150503_091538

हवामानातील बदलांचा कोकणातील मासेमारीला फटका

अलिबाग प्रतिनिधी : हवामानातील बदलांचा कोकणातील मासेमारीला फटका बसला आहे.समुद्रात येणारी भागांची भरती, अवेळी पडणारा पाऊस, वाढलेली थंडी, वारा तसेच सतत बदलत असलेले वातावरण, किनारपट्टीवर एलईडी लाईट आणि पर्ससिन बोटींच्या साह्याने केली जाणारी अनियंत्रित मासेमारी यामुळे कोकणातील मासेमारी व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. किनारपट्टीवरील भागात मासे मिळेनासे झाले आहेत. खोलसमुद्रात जाऊनही फारसे मासे मिळत नाही. […]

Continue Reading
Uran-shiv-smarak

उरण येथे शिवस्मारकाचे लोकार्पण,दासभक्तांची अलोट गर्दी

उरण प्रतिनिधी : उरणच्या दास्तान फाट्यावर जेएनपीटीने उभारलेल्या भव्य शिव-समर्थ स्मारकाचे लोकार्पण रविवारी दि. १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,ज्येष्ठ निरूणपकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. जेएनपीटीच्या प्रवेशद्वारावर दोन एकर क्षेत्रात २० फूट उंचीचा श्रीसमर्थ आणि शिवरायांचा उभा भव्य पर्णाकृती ब्रॉंझचा पुतळा उभारण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी रायगडसह राज्याच्या कानाकोपऱ्यातून तब्बल सात लाख […]

Continue Reading
CvHoaNRWgAACLtf

मुरुड किनाऱ्यावर जेटी नसल्याने बोटींचे नुकसान

मुरुड प्रतिनिधी : मुरुड हे पर्यटनस्थळ असल्याने पर्यटक मुरुडची ताजी मासळी खाण्यासाठी आवर्जून येतात. मुरुड कोळी बांधवांना सध्या मासळीच्या दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. कधी सोसाट्याचा वारा तर कधी एलईडी वापरून मासेमारी करणाऱ्यांमुळे मासळी समुद्रात नाहीशी होते. त्यात किनाऱ्यावर जेटी नसल्याने मासेमारी करून आलेल्या बोटी वाळूत उभ्या कराव्या लागतात. परिणामी लाटांच्या माऱ्यात बोटीच्या खालील बाजूस […]

Continue Reading
unnamed

झिराड ग्रामपंचायत रायगड जिल्ह्यातील पहिली डिझिटल ग्रामपंचायत

अलिबाग प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील झिराड ग्रामपंचायतीने डिझिटल ग्रामपंचायत माध्यमातून ग्रामपंचायत घरोघरी डिजी ग्राम हे अप्लिकेशन तयार केले असून त्याचे लोकार्पण करण्यात आले. झिराड ग्रामपंचायतीला डिजिटल ग्रामपंचायत बनण्याचा पहिला बहुमान जिल्ह्यात मिळाला आहे. ग्रामपंचायत डिजिटल मोबाईल अप्लिकेशनमुळे झिराड ग्रामपंचायत आता ग्रामस्थांना घरात पोहचली असून एका क्लिकवर प्रत्येक माहिती ग्रामस्थांना प्राप्त होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या […]

Continue Reading
SARPANCH

रोह्यातील सारसोली ग्रामपंचायत सरपंच बिनविरोध

रोहा प्रतिनिधी :रोहा तालुक्यात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या सहा ग्रामपंचायतींपैकी धाटाव,किल्ला,संभे,पुगाव,पाटणसई,सरसोली अशा ग्रामपंचायतींचा कार्यकाळ डिसेंबर २०१८ मध्ये संपला असून यासाठी २४ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक होत आहे. शासनाच्या अटी शर्तीनुसार थेट सरपंच जनतेचा असल्यामुळे सरपंच कोण आणि कोण सदस्य यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. ११ फेब्रुवारी रोजी उमेदवार अर्जाची छाननी तर १३ फेब्रुवारी रोजी उमेदवार […]

Continue Reading
indian-railway66666

आंगणेवाडीची जत्रा,भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेच्या १० जादा गाड्या

मुंबई प्रतिनिधी : आंगणेवाडीची जत्रा २५ फेब्रुवारीला आहे. जत्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने आंगणेवाडीला जातात. त्यांच्या सोयीसाठी मध्य रेल्वे मार्गावरून आंगणेवाडी जत्रेसाठी विशेष १० जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. सीएसएमटी ते करमळी दोन विशेष गाड्या सोडण्यात येतील. गाडी क्रमांक ०११५७ सीएसएमटीहून २३, २४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, […]

Continue Reading
mora-to-gate-way

पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रतिनिधी :महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना व पेण तालुका हौशी जलतरण संघटनेच्या जलतरणपटूंनी मोरा जेट्टी ते गेट वे ऑफ इंडिया हे 16 किलोमीटरचं सागरी अंतर वैयक्तिकरित्या यशस्वी पूर्ण करुन पेणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या जलतरण मोहिमेत पेण येथील 3 जलतरणपटू सहभागी झाले होते. सकाळी 6:15 वा. या सर्व जलतरणपटूंनी समुद्रात झेप घेतली. कु.मधुरा […]

Continue Reading
crime-a-1532096216-9317

एसटी महामंडळाच्या बसमधूनच दारूची वाहतूक,बस चालकास पकडले

सिंधुदुर्ग प्रतिनिधी –एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाने एसटी महामंडळाच्या बसमधूनच गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करताना पणजी – देवगड बस चालकासच पकडले आहे. एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाच्या या कारवाईने एसटी विभागात खळबळ उडाली आहे. एसटीच्या सुरक्षा व दक्षता पथकाने सकाळी ओरोस बस स्थानकात तपासणी मोहीम सुरू केली. सकाळी अकराच्या सुमारास स्थानकावर पणजी-देवगड बस (एमएच -२०- […]

Continue Reading
Fisher1

कोकण किनारपट्टीवरून मासे गायब,मच्छीमार चिंतेत

सिंधुदुर्ग प्रतिनिधी :समुद्रावरील वाऱ्याचा वेग गेल्या काही दिवसांपासून कमी झाल्यानंतरही मासे मिळत नसल्याने येथील मच्छीमार चिंतेत आहेत. बंगालच्या उपसागरावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा गेल्या आठवडय़ात कोकण किनारपट्टीला फटका बसला. ताशी ४० ते ५० किलोमीटरने वाहणाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे सलग चार दिवस मासेमारी बंद ठेवावी लागली. या आठवडय़ाच्या सुरुवातीपासून वाऱ्याचा वेग मंदावल्याने मासेमारीला पुन्हा सुरुवात झाली, पण समुद्रात […]

Continue Reading
7e45624d8cf36b1ed8b8c1b7c3c98da4

धक्कादायक ! खोपोलीत चार वर्षांच्या मुलीची हत्या

खोपोली प्रतिनिधी : खोपोली शहरात शिळफाटा पटेलनगर येथील कुटुंबातील चार वर्षांची चिमुरडी मंगळवार (ता.12) सकाळी 10 वाजल्यापासून गायब झाल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहिती नुसार, शिळफाटा पटेल नगर येथे परराज्यातून पोटाची खळगी भरण्यासाठी चालक असणारा धर्मसिंग आपली पत्नी पुष्पा व तीन लहान मुले सह सहा महिन्यापासून वास्तव्य करीत आहे. 12 फेब्रुवारी मंगळवारी सकाळी 10 वाजल्यापासून त्यांची […]

Continue Reading