Suicide-784x441

कॉलेजच्या टेरेसवरुन उडी मारून विध्यार्थीनीची आत्महत्या

लातूर येथील त्रिपूरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थीनीने महाविद्यालयाच्या टेरेसवरून उडी मारुन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थीनीच्या वडीलांनी पोलीसांकडे केली आहे. राज्यभरातून दरवर्षी २५ हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी लातूर शहरात शिक्षणासाठी दाखल होतात. अशीच कोल्हापुरच्या हातकणंगले तालुक्यातील एका गावामधून शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थीनीने १७ जुलै रोजी कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी […]

Continue Reading
297394-new100note

आता लवकरच चलनात येणार शंभर रुपयांची नवी नोट

नोट बंदीनंतर २००, ५०० आणि २००० रुपयांच्या नव्या नोटात चलनात आल्या. त्यानंतर ५० रुपये, २० रुपये आणि १० रुपयांच्या नवीन नोटा चलनात आल्यात. आता १०० रुपयांची नवी नोट चलनात येणार आहे. शंभर रुपयांची नवीन नोट चलनात आणणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेकडून करण्यात आली आहे. ही नोट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. या नव्या नोटेचे फोटो […]

Continue Reading
1

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर लवकरच होणार मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध

देशातील सर्व रेल्वे स्थानकांवर प्रवाशांना लवकरच मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता फ्री वाय-फायचा लाभ घेता येणार आहे. लोकसभेत बुधवारी (18 जुलै) एका प्रश्नाचं उत्तर देताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री राजेन गोहेन यांनी याबाबत माहिती दिली. वर्ष २०१६-१७मध्ये १००, २०१७-१८मध्ये २०० तर २०१८-१९ या वर्षात ५०० स्टेशनांवर वाय-फाय […]

Continue Reading
DicNDpWWsAAfFQs

उत्तराखंडमध्ये भीषण अपघात,दहा जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाला असून, ९ जण जखमी झाले आहेत. ऋषिकेश-गंगोत्री महामार्गावरील सूर्यधर येथे हा अपघात झाला. गुरुवारी सकाळी उत्तराखंड परिवहन मंडळाची बस ऋषिकेश गंगोत्री महामार्गावरून जात असताना सूर्यधर येथे ही बस २५० मीटर खोल दरीत पडली. या भीषण अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. तर ९ […]

Continue Reading
ae6367e1c446b2fe0f2127bbd8cc439f

विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद

तिसऱ्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांची मालिका इंग्लंडने २-१ अशी जिंकली. मात्र पराभवानंतरही विराट कोहलीच्या नावावर आणखी एक विक्रमाची नोंद करण्यात आलेली आहे. कर्णधार या नात्याने सर्वात जलद ३ हजार धावा करणारा कोहली पहिला फलंदाज ठरला आहे. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर कोहलीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. विराट […]

Continue Reading
solapur-milk-tanker-01

दूध आंदोलन,शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला हिंसक वळण

विविध मागण्यांसाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला बुधवारी हिंसक वळण लागले. कोल्हापूरमधील जयसिंगपुरात आंदोलकांनी गोकुळ दूध संघाचा टँकर पेटवून दिला तर जनतारा शाळेजवळ आंदोलकांनी २० कॅन दूध रस्त्यावर ओतले. दुधाला प्रति लिटर पाच रुपये दराने अनुदान मिळावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारपासून राज्यभरात आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी या आंदोलनाचा तिसरा दिवस असून या […]

Continue Reading
297201-g-noida-3

उत्तर प्रदेशात दोन इमारती कोसळल्या; ३ ठार

ग्रेटर नोएडामध्ये दोन इमारती कोसळल्या आहेत. यामध्ये एक चार मजली आणि दुसरी बांधकाम सुरु असलेली सहा मजली इमारत कोसळली. शाहाबेरी परिसरात मंगळवारी रात्री उशिराने हा अपघात झाला असून यामध्ये जवळपास ५० जण ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची शंका व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत तीन जणांचा मृतदेह हाती लागले असून यामध्ये एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे. […]

Continue Reading
f02bdfe2cae639d2bfece546a74776ec

आता एल्फिन्स्टन रोड नव्हे, ‘प्रभादेवी’ !

एल्फिन्स्टन रोड स्थानकाच्या नामांतराची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.पश्चिम रेल्वेवरील एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव बुधवारपासून प्रभादेवी होईल. १७ जुलैच्या मध्यरात्रीपासून या नवीन नावाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात आदरार्थी ‘महाराज’ शब्दाचा समावेश करावा, या मागणीसह एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे प्रभादेवी नामांतर करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात […]

Continue Reading
main-qimg-b2c916f695c3b4bf552e9a1157ebaac2

अर्जुन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत दमदार सुरवात

१९ वर्षाखालील भारत विरुद्ध श्रीलंका संघात मंगळवारी (१७ जुलै) कोलंबो येथील नॉडेस्क्रीप्ट क्रिकेट क्लबच्या मैदानावर पहिला कोसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुत्र अर्जुनने आपल्या १२ व्या चेंडूवर बळी मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दमदार आगमन केले आहे. या चार दिवसीय कसोटी सामन्यात श्रीलंका संघाने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.भारतीय कर्णधार […]

Continue Reading
alcohol

या राज्यात सार्वजनिक ठिकाणी दारु पिणाऱ्यास होणार दंड

पुढील महिन्यापासून गोव्यामध्ये कोणीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना अथवा घाण करताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली आहे. पर्रिकर म्हणाले, ”ऑगस्ट महिन्यापासून जर कोणी व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी दारू पिताना आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल. जवळपास २५०० रुपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. लवकरच त्यासाठी योग्य ती […]

Continue Reading