suresh gejge

करोळे येथील सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला जबाबदार कोण ?

गावाकडच्या बातम्या महाराष्ट्र

पंढरपूर – तालुक्यातील करोळे या गावचे रहिवाशी कै.सुरेश गेजगे यांचा मागील आठवड्यात आकस्मित मृत्यू झाला. गुरुवार दिनांक १८ एप्रिल २०१९ पासून घरी न आलेले सुरेश गेजगे यांचा मृत अवस्थेतील देह शनिवार दिनांक २० एप्रिल २०१९ रोजी गावच्या भीमा नदीच्या पाण्यावर तरंगताना आढळला. त्याचवेळी, प्रत्यक्षदर्शी बघणाऱ्यांनी गेजगे यांच्या घरी निरोप पाठविला. गावच्या पोलीस पाटलांनी करकंब येथील पोलीस स्थानकात याबद्दल माहिती दिली. करकंब पोलीस स्थानकात पाण्यात बुडून मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. परंतु , मयत सुरेश गेजगे यांच्या अंगावर ठिकठिकाणी मोठ्या आकाराचे फोड होते, डोळे बाहेर पडले होते. नदीच्या काठावर कंबरेइतके देखील नसलेल्या पाण्यात, ते देखील पोहता येणाऱ्या व्यक्तीचा पाण्यात बुडून कसा काय मृत्यू होऊ शकतो? पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या अंगावर इलेक्ट्रिक शॉक लागल्याप्रमाणे फोड कसे काय आले होते? पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तीचे अंग इलेक्ट्रिक शॉक लागल्याप्रमाणे काळे कसे काय पडले होते ? त्यामुळे, सुरेश गेजगे यांचा मृत्यू संशयास्पद आहे. यात शंका नाही.

सुरेश गेजगे यांना नदीवर कोण घेऊन गेले? ती व्यक्ती कोण? समोर का येत नाही ?

गुरुवार दिनांक १८ एप्रिलला गावातील एक व्यक्ती सुरेश गेजगे यांना आपल्या पंपाजवळील गाळ आणि शेवाळ काढण्याच्या कामासाठी भीमा नदीच्या काठावर घेऊन गेली होती. गावातील प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार, नदीच्या दिशेने जाताना ती व्यक्ती आणि सुरेश गेजगे सोबत होते. परंतु, नदीवरून परत येताना ती व्यक्ती एकटी येत होती. शिवाय, जेंव्हा सुरेश गेजगे यांच्या घरातील माणसे त्यांचा शोध घेत होते तेंव्हा त्या व्यक्तीने पुढे येऊन झालेल्या घटनेची कल्पना देणे गरजेचे होते. परंतु, तसेही झाले नाही आणि सुरेश गेजगे यांचा मृतदेह भेटल्यावर सुद्धा ती व्यक्ती समोर आली नाही.
कदाचित, त्या व्यक्तीच्या समोरच सुरेश गेजगे यांचा जीव गेला असेल. पण, त्यांना वाचवायचे सोडून त्या व्यक्तीने तेथून पळ काढला असावा ?
मयत सुरेश गेजगे यांच्या मृत्यूला ती व्यक्तीतर जबाबदार नाही ?

कै. सुरेश गेजगे यांच्या पश्चात त्यांची पत्नी सारिका, मुलगा पंकज आणि मुली सोनल आणि शिवानी असा परिवार आहे.

तरी, सदर प्रकरण दाबण्याचा आणि फाईल बंद करण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असला तरी सुरेश गेजगे यांच्या नाहक मृत्यूला, त्यांच्या बळीला जो कोण जबाबदार असेल त्याला शिक्षा झाल्याशिवाय कोणीही गप्प बसणार नाही. असे अनेकजणांनी बोलून दाखविले आहे. त्यामुळे, न्याय हा मिळणारच !

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *