nilesh rane manifesto

निलेश राणे यांचा जाहीरनामा प्रसिद्ध

कोकण महाराष्ट्र राजकीय

रत्नागिरी : विविध आश्वासनांनी युक्त असा बुकलेट टाईप जाहीरनामा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी आज प्रसिद्ध केला. सोळा पानी या जाहीरनाम्यात रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील विविध प्रश्नांचा आणि समस्यांचा उल्लेख असून मी हे करणार असे ठामपणे सांगणारा हा जाहीरनामा आहे.

निलेश राणे यांच्या जाहीरनाम्यातील काही मुद्दे

⚫ आंबा व इतर उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळावी म्हणून प्रयत्न करून खाद्यपदार्थ प्रक्रिया केंद्रे उभारली जाणार

⚫वाड्या वस्त्यांवरील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार

⚫सिंचन प्रकल्पांची क्षमता वाढविण्यावर भर दिला जाणार

⚫तालुकानिहाय गावठी आठवडा बाजार हि संकल्पना राबवणार

⚫गोवा  इतर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पर्यटन स्थळांच्या धर्तीवर रत्नागिरी व सिधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा दर्जा उंचावून पर्यटन वाढीस उत्तेजना देणार

⚫जिल्ह्यातील १० वर्षापेक्षा अधिक जुना बचतगट असल्यास त्यांच्या प्रमुख १० उत्पादनांचे योग्य विपणन आणि विक्रीची जबाबदारी घेणार

⚫कौसल्य भारत योजनेद्वारे प्रशिक्षण केंद्रे उभारली जाणार

⚫पर्यावरणपूरक मोठ्या कंपन्यांना गुंतवणुकीस आकर्षित केले जाणार

⚫इयत्ता पहिले त बारावीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची सुसज्ज शाळा उभारणार

⚫रत्नागिरीत ipl दर्जाचे क्रीडांगण बनवण्यात येणार

⚫कोकण रेल्वेचे दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार

⚫शिवरायांचा वारसा जपण्यासाठी गडांचे संवर्धन करणार

⚫जिल्हा वैद्यकीय मदतीस सज्ज करून ५० महत्वाच्या औषधांची यादी तयार करून गरजूंना घरपोच पोहचण्याची व्यवस्था करणार

⚫पोलीस बांधवांसाठी कल्याणकारी योजना राबवणार

⚫माजी मंत्री कै. ल. र. हातणकर यांचे राजापूर येथे स्मारक उभारणार

⚫लोकनेते शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला १०० कोटी रुपये मिळवून देऊन कुणबी समाजाच्या मदतीसाठी काम करणार

⚫निलेश राणे यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करीत असतांना महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांचा जाहीरनामा खोटा असल्याचे सांगितले. खासदारकी दरम्यान कुणाचा निधी किती खर्च झाला याचे पुरावे देखील निलेश राणे यांनी दिले. विनायक राऊत यांच्या जाहीरनाम्यात देण्यात आलेले अनेक मुद्दे खोटे असून याबात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली जाणारा असल्याची माहिती निलेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *