ratnagiri-sindhudurg

रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये निलेश राणे यांच्याच नावाची चर्चा

कोकण महाराष्ट्र मुंबई राजकीय

रत्नागिरी – रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला आहे. या प्रचारा दरम्यान सर्वत्र महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांचीच जास्त चर्चा होत असताना दिसत आहे.

मतदार संघातील एका तरुणाने अनोख्या पद्धतीने प्रचार करून निलेश राणे यांना पसंती दाखविली आहे. यात त्याने आपल्या राहत्या घराच्या दारावर स्वतःच्या हस्ताक्षरात एक नोटीस लावली आहे. त्यात त्याने येथे फक्त मा.श्री.निलेशजी राणे साहेब यांनाच यथे मत मिळेल. बाकी कुठल्याही पक्षाने येथे मत मागायला येऊ नये. अशा स्पष्ट शब्दांत आपले मत मांडले आहे.

सदर पोस्ट ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार निलेश राणे यांनी या तरुणाचे ट्विटरच्या माध्यमातून आभार मानले आहेत. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे यांनी “आभार मानायला माझ्याकडे शब्द नाही ?? मी नेहमी आपला ऋणी राहीन.” असे लिहून आभार व्यक्त केले आहेत.

यावरून, रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये खासदार विनायक राऊत यांच्याविषयी मतदारांमध्ये प्रचंड नाराजी आणि उदासीनता दिसून येत आहे. याउलट, निलेश राणे यांना मतदारांचा प्रचंड प्रमाणात पाठिंबा आणि तरुणाईचा उस्फुर्त प्रतिसाद दिसून येत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *