hope nilesh rane

माझ्या तरुण मित्रांनो, आपण देऊया तरुण उमेदवारालाच संधी

अग्रलेख कोकण महाराष्ट्र संपादकीय
नव्या पिढीचे नवे प्रश्न सोडविण्यासाठी तरुणांनीच पुढे यायला हवं आहे. उद्याचे प्रश्न सोडविण्यासाठी आजच्या तरुण पिढीने तयार व्हायला हवे. विकासाला विरोध करणाऱ्यांच्या विरोधात तरुणांनी पेटून उठलं पाहिजे.आपण तरुण आहात. आपला खासदार हा सुद्धा तरुण असला पाहिजे. लक्षात ठेवा, ही निवडणूक जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची निवडणूक आहे. आणि आपण या चळवळीचे साक्षीदार आहोत. ही निवडणूक पंतप्रधान निवडण्याचे नाही तर या मतदानाद्वारे आपण आपला हक्काचा खासदार, आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहोत.आपल्या मतदार संघात एखादी समस्या उद्भवल्यास ती सोडविण्यासाठी नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी येणार नाहीत. तर आपण निवडून दिलेला खासदारच येणार आहे. आपल्या मतदार संघातील असलेल्या समस्या आणि आपल्या मागण्या नरेंद्र मोदी किंवा राहुल गांधी हे सभागृहात मांडणार नाहीत. तर आपण निवडून दिलेला खासदार मांडणार आहे.
त्यामुळे, मित्रहो नीट विचार करा. एकदा मतदान केले की पुन्हा पाच वर्षे या पदासाठी आपण मतदान करू शकणार नाही. त्यामुळे एकदा का चुकीचा उमेदवार निवडून आला तर आपण आणि आपला जिल्हा पाच वर्षे मागे पडल्यासारखे आहे.
आपण, रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदार संघाचा विचार केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तरुण उमेदवार, की ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रात युवकांचे नेते अशी ओळख आहे असे निलेश राणे हे खरोखरच आपले खासदार होण्यासाठी पात्र आहेत. त्यांचे आणि इतर उमेदवारांचे शिक्षण पाहता, एक उच्चशिक्षित उमेदवार की ज्याचे इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. त्यामुळे, सभागृहात कोणत्याही विषयावर निलेश राणे आपले योग्य मुद्दे आणि विचार मांडू शकतात. उच्चशिक्षित आणि तरुण असल्याने तरुणांच्या समस्या सोडविण्यांचे सामर्थ्य त्यांच्यात आहे. इतर उमेदवारांच्या मानाने निलेश राणे हे खूपच तरुण असून त्यांच्यात काम करून दाखविण्याची जिद्द,अनुभव,आत्मविश्वास आणि विकासाची दूरदृष्टी आहे.
याच दूरदृष्टीच्या जोरावर आमदार नितेश राणेंयांनी आमदार नसताना देखील तब्बल २५ हजार ३०० युवकांना एकाच दिवशी नोकऱ्या देण्याचे काम केले आहे. वैभववाडीच्या संपूर्ण विकासासाठी त्यांनी अभ्यास करून जे ‘व्हिजन’ तयार केलेय त्यातूनच त्यांची दूरदृष्टी दिसून येते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार श्री.नारायण राणे यांच्या दूरदृष्टीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंजिनिअरिंग कॉलेज,मेडिकल कॉलेज,हॉस्पिटल,महिला भवन असे अनेक प्रकल्प स्वखर्चातून उभारले गेले आणि यातून हजारो स्थानिक युवकांना आणि महिलांना रोजगार निर्माण झाले. माजी खासदार आणि आताचे उमेदवार निलेश राणे यांनी कोणतेही पद नसताना गणेश मूर्तींवरील लावण्यात येणारा जिएसटी कर रद्द केला की जे हे काम कोकणातील इतर खासदारांना जमले नाही. यासाठी असावी लागते विकासात्मक दूरदृष्टी.
राहिली, गोष्ट शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची. ते येतील, एखादी सभा घेतील, जातील. ते पुन्हा पाच वर्षे येणार नाहीत. परंतु , याउलट कोकण भाग्यविधाते नारायण राणे हे स्वतः तुमच्या सेवेशी तत्पर असणार आहेत. याचे आपण भान ठेवले पाहिजे.
नारायण राणे साहेब,निलेश राणे साहेब,नितेश राणे साहेब अशा नेत्यांमुळेच उद्या वैभवशाली सिंधुदुर्ग , अग्रेसर रत्नागिरी आणि पर्यायानं सामर्थ्यशाली कोकण  घडणार आहे.
नितीन नामदेव पाटील 
सी ई ओ 
एस एन पी सॉफ्टवेअर  
Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *