joy bhosale

उत्तर मध्य मुंबईतून सामाजिक कार्यकर्त्या जॉय भोसले यांचा उमेदवारी अर्ज

मुंबई

मुंबई – वांद्रे पूर्व येथील स्थानिक रहिवाशी आणि सामाजिक कार्यकर्त्या सौ.जॉय भोसले यांनी काल दिनांक ९ एप्रिल २०१९ ला उत्तर मध्य मुंबई या लोकसभा  मतदार संघातून आपल्या उमेदवारीचा अर्ज वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला. वांद्रे येथील शासकीय वसाहतीत लहानाच्या मोठ्या झालेल्या जॉय या अनेक वर्षांपासून विविध प्रकारचे सामाजिक कार्य करत आहेत. वांद्रे येथील स्थानिक असल्याने जॉय यांना आपल्या परिसरातील असलेल्या समस्यांची योग्यरित्या जाणीव आहे. शिवाय, कला क्षेत्राची आवड असलेल्या जॉय यांचा ‘जॉय कलामंच’ सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *