30_big

रोहेकर, नदीचे पात्र वाचविण्यासाठी रस्त्यावर

कोकण महाराष्ट्र

रोहा प्रतिनिधी : कुंडलिका नदीचे पात्र वाचविण्यासाठी रोहेकर सोमवारी रस्त्यावर उतरले होते. तसेच गावातून रॅली काढून रोहा नगर पालिकेला कुंडलिका बचाव संघर्ष समितीच्या माध्यमातुन दिडशेहून अधिक नागरिकांच्या सहयांचे निवेदन देण्यात आले.

 

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

 

यारॅलीमध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.रोहेकरांची जिवनदायिनी असलेल्या कुंडलिका नदीत संवर्धनाचे काम सूरु असुन त्यासाठी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकुन आणि बांधकाम करुन नदीचे पात्र अरूंद केले जात आहे. परिणामी कुंडलिका नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. पात्रात दोन्ही किनारी सिमेंटच्या भिंती तयार करण्याचे काम सुरू आहे. यामुळे नदीपात्र बंदिस्त होणार आहे. ही परिस्थिती पहाता नदीच्या प्रवाहात अडथळा निर्माण होईल असे कोणतेही काम करु नये.असे निवेदन देण्यात आले.   रोहयाचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांनी रॅलीला सामोरे जात निवेदन स्विकारले. तसेच निवेदनाचा सर्वकषपणे विचार करुन आपल्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *