devendra-fadnavis-650_650x400_71488628785

चौकशीनंतर योग्य ती कारवाई केली जाईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र

पुणे प्रतिनिधी :कर्णबधीर तरुणांच्या मोर्चावर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमाराचे मोठे पडसाद राज्यभरात उमटले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचा आदेश पुण्याच्या पोलीस आयुक्तांना दिला आहे.

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

शैक्षणिक सुविधांसह रोजगाराच्या मागणीसाठी कर्णबधीर तरुणांकडून हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी काही तरुणांनी बॅरिकेट्स बाजुला सारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.पोलिसांच्या लाठीमारानंतर आंदोलनकर्ते कर्णबधिर पुण्यातील समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या देऊन बसले.मुंबईत सरकारकडून कर्णबधिरांच्या मागण्यांबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच हे आंदोलन थांबवले जाईल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *