england-ke-indians-ne-uthai-evm-ke-khilaf-aawaj-01

अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर

कोकण महाराष्ट्र

अलिबाग प्रतिनिधी : अलिबाग तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत २५ पैकी शेकापचे १३ तर शिवसेना, काँग्रेस आघाडीने १२ ग्रामपंचायतीवर पक्षाचे सरपंच निवडून आले आहेत.

 

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

 

काल रविवार दि. २४ फेब्रुवारी रोजी अलिबाग तालुक्यातील २५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी झाल्या. त्यांचे आज निकाल जाहीर झाले आहेत.यात शेकापला धोकवडे, बोरघर, रामराज, सुडकोली, वरंडे, पोयनाड, श्रीगाव, चरी, शहापूर, आंबेपूर, बेलकडे, सहाण या ग्रामपंचायती राखण्यात यश आले आहे. तर शिवसेनेने थळ,चौल या ग्रामपंचायती राखल्या असून कोलटेंभी, कुसुबळे, ताडवागळे, ढवर,कुरकुंडी या ग्रामपंचायतीवर शिवसेने विजय मिळवला आहे.आगरसुरे,सारळ, कुर्डुस, बामणगाव, चिंचोटी, बेलोशी या ग्रामपंचायतीवर शिवसेना व काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे.
सारळ, आगरसुरे या ग्रामपंचायतीवर काँग्रेसचे सरपंच निवडून आले असून,कुर्डुस,चिंचोटी, बामणगाव, बेलोशी, या ग्रामपंचायतीवर शिवसेना व काँग्रेस आघाडीचे सरपंच निवडून आले आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *