BL08_Slate

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार

महाराष्ट्र शिक्षण

मुंबई प्रतिनिधी : शासनाने शुक्रवारी शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय जाहीर केलाआहे. अनुदानित अशासकीय शाळांतील पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग अखेर लागू करण्यात येणार आहे.

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

शासकीय कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होत असताना शिक्षकांना मात्र वेतन आयोग लागू करण्यात आला नसल्याचा आक्षेप संघटनांनी घेतला होता.वेतन आयोग लागू झाल्यानंतर शिक्षकांना कधी सहा महिन्यांनी तर कधी आठ महिन्यांनी वेतन आयोग लागू व्हायचा. पण यंदा पहिल्यांदाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रयत्नाने शिक्षकांनाही शासकीय कर्मचाऱ्यांबरोबरच सातवा वेतन आयोग लागू झाला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *