maharashtra-board

बारावीची परीक्षा उद्यापासून सुरू

महाराष्ट्र शिक्षण

मुंबई प्रतिनिधी : राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीची परीक्षा उद्यापासून (ता.21) सुरू होत आहेत. या परीक्षेसाठी राज्यभरातून 14 लाख 91 हजार 306 विद्यार्थी बसले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या वेळेपूर्वी अर्धातास म्हणजे साडेदहाच्या पूर्वी आणि दुपारच्या सत्रात अडीच पूर्वी परीक्षा केंद्रावर हजर राहायचे आहे.

WhatsApp Image 2019-02-19 at 8.21.05 PM

विद्यार्थ्यांनी मंडळाने प्रसिद्ध केलेले वेळापत्रक अधिकृत म्हणून ग्राह्य धरावे. खासगी संस्था वा व्यक्तींनी दिलेल्या वेळापत्रकांवर विश्‍वास ठेऊ नये, असे आवाहन मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले आहे. या परीक्षेवेळी कोणताही विद्यार्थी वा पर्यवेक्षक यांना परीक्षा केंद्रात मोबाइल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सुचना
– परीक्षेसाठी निळा आणि काळा शाईच्या पेन वापरण्यास परवानगी आहे.
– परीक्षा केंद्रात मोबाइल अथवा इलेक्‍ट्रॉनिक वस्तू नेण्यास मनाई आहे.
– पेपरची अदलाबदल होऊ नये म्हणून उत्तरपत्रिका आणि पुरवण्यांवर बारकोड
– संवेदनशील परीक्षा केंद्रावर पूर्णवेळ बैठे पथक असेल, चित्रीकरणही होणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *