1200px-Reliance_Jio_Logo_(October_2015).svg

रिलायन्स जिओचा धमाका, लाँच केला वर्षभरासाठीचा प्लान

देश व्यापार

मुंबई प्रतिनिधी :रिलायन्स जिओने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश केल्यापासून आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगळे प्लान, ऑफर देत आहे. त्यातच आता रिलायन्स जिओने एक नवा धमाकेदार वर्षभरासाठीचा प्लान लाँच केला आहे. यात 5 प्रकारचे वेगवेगळ्या प्लानचा समावेश आहे.


MMT - DF [CPS] IN

जिओच्या 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. त्याशिवाय दररोज 100 मेसेजही फ्री असतील. या प्लॅनमध्ये वर्षभरात 547 जीबी इंटरनेट वापरता येणार आहे. दररोज दीड जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असलेला 84 दिवसांचा प्लॅनही आहे. हा प्लॅन 399 रुपयांचा असून यातही 100 मेसेज दररोज फ्रि मिळतील. 349 रुपयांच्या प्लॅनमध्ये दररोज दीड जीबी इंटरनेट, अनलिमिटेड कॉल आणि 100 मेसेज फ्री मिळणार आहेत. याची वैधता 70 दिवस असणार आहे.
जिओचा 91 दिवसांसाठी 449 रुपयांचा प्लॅन आहे. यातही दीड जीबी इंटरनेट, अनलिमिटेड कॉल करता येणार आहेत. तसेच दररोज 100 मेसेज फ्री मिळणार असून नॅशनल रोमिंग फ्री असणार आहे. जिओने 149 रुपयांचा 28 दिवसांसाठीचा प्लॅनही दिला आहे. यात दररोज दीड जीबी इंटरनेट आणि कॉल, मेसेज फ्री मिळतील.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *