remote-control-for-jvc-RM-C3130-TV-REMOTE-CONTROLLER-changhong.jpg_640x640

ट्रायने दिली आवडीचे चॅनल निवडण्याची मुदतवाढ

देश व्यापार

मुंबई प्रतिनिधी : आवडीचे चॅनल निवडण्यासाठी १ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली होती. मात्र, केबल सेवा असलेले ६५ टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या केवळ ३५ टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या वाहिन्यांची निवड केली असल्याची माहिती ट्रायने दिली. अनेक जणांना नव्या नियमांनुसार टीव्ही चॅनलचे पॅक कसे निवडावे याबद्दल माहिती नाही किंवा संभ्रम आहे. परिणामी, ट्रायने ‘व्यापक जनहिताचा विचार करून ज्या ग्राहकांनी आपले चॅनल निवडलेले नाहीत त्यांना त्यांच्यासाठी योग्य असलेल्या पॅकमध्ये (बेस्ट फीट प्लॅन) समाविष्ट केले जावे किंवा जोपर्यंत ग्राहक आपले चॅनल निवडत नाहीत किंवा त्यांना इतर योग्य पॅकमध्ये समाविष्ट केले जात नाही तोपर्यंत सध्या ग्राहकाचा सुरु असलेला पॅकच सुरू ठेवावा, असे आदेश दिले आहेत.


Netmeds [CPS] IN

ग्राहकांसाठी बेस्ट फिट प्लान तयार करण्याचे आदेश ट्रायने डीटीएच ऑपरेटर आणि स्थानिक केबलचालकांना दिले आहेत. त्यात ग्राहकांकडून सर्वसाधारणपणे पाहिल्या जाणाऱ्या वाहिन्यांचा समावेश असेल. एखाद्या विशिष्ट विषयाला वाहिलेल्या, प्रादेशिक भाषेच्या आणि काही वृत्तवाहिन्या अशा एकत्र वाहिन्यांचे मिळून ‘बेस्ट फिट प्लॅन’ पॅकेज तयार करण्याचे आदेश ट्रायने दिले आहेत. ते तयार करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता ३१ मार्चपर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. नव्या नियमानुसार प्रक्षेपण १ फेब्रुवारीपासून अमलात येण्यास सुरुवात झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *