5c8d8f58ff63da302744eb1f89afee61

उरण जेएनपीटी शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

कोकण महाराष्ट्र

उरण प्रतिनिधी :जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान 30 कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, ज्येष्ठ निरुपणकार डॉ. नानासाहेब धर्माधिकारी, संभाजीराजे भोसले, दुर्ग समीतीचे अध्यक्ष, खासदार श्रीरंग बारणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याचा दावा जेएनपीटीने मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.


TVC-mall WW

जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीवर आधारीत शिवस्मारक उभारण्याचे काम मागील वर्षापासून सुरु केले आहे. सुमारे 30 कोटी खर्चून 22 मीटर उंचीचे हे स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या पावणे दोन एकर जागेत उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या पुतळ्याचे काम थोर शिल्पकार दिपक थोपटे यांनी केले आहे. परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन वस्तुंचे म्युझियम, मिनी एमपी थिएटर, कॅफेटरिया, फाऊंटन गार्डन आदीं सुविधाही उभारण्यात येत आहेत. या स्मारकाचे बांधकाम फेब्रुवारी 2019 मध्ये पुर्ण करण्याची मुदत आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *