प्रतिनिधी : दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्याला अवकाळी पावसाने अल्पशा पाण्यावर होणाऱ्या डाळिंब, केळी ,द्राक्षे,या पिकासह आंब्याच्या मोहोरास चांगलेच झोडपून काढले.फळपिकापासून कर्जमुक्तीच्या आशेवर असलेल्या शेतकऱ्याला उलट कर्जात ढकलले. एक तर दुष्काळी परिस्थितीत शेतकरी पाण्यासाठी सातशे फुटांच्या खाली असलेल्या विंधन विहीर प्रसंगी फळपीकाच्या अंतीम टप्यात विकतचे पाणी घेवून बागा जगवल्या जात असताना या अवकाळी पाऊस चिक्कलगी, शिरनांदगी, बावची, मारोळी, शिरनांदगी, हुन्नुर, रड्डे परिसरात झोडपले.
गेल्या दोन वर्षापासून महसूल व कृषी खात्याकडून अवकाळीचे पंचनामे होतात. यासाठी कागदपत्राची झेरॉक्स व फोटो देवून आर्थिक झळ सोसावी लागते पण नुकसानभरपाई जमा करण्याचे फक्त गाजर दाखविले जाते. यावर काही लोकप्रतिनिधीकडूनही मदत मिळवून देण्याचा दावा केला जातो पण प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांच्या बॅक खातेवर काहीच जमा होत नाही.चौकशी केल्यावर अहवाल शासनाला दिला आहे मंजूर झाल्यावर बघू हे शासकीय उत्तर ऐकावयास मिळते. त्यामुळे या भागातील बागायतदार शेतकय्रांची अवस्था पावसाने झोडपले शासनाने मारले आणि महसूल खात्याने छळले तर फिर्याद कोणाकडे नाही अशी अवस्था शेतकऱ्याची झाली.