1

सूर्य दोन तास लवकर मावळल्याने पूर्व भारतात मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम ?

देश

प्रतिनिधी : संपूर्ण भारतासाठी एकच प्रमाण वेळ (time zone) ही ब्रिटीश राजवटीची देणगी आहे. एकाच वेळेवर सगळा देश चालवणं हे एकात्मतेचं प्रतीक होतं. पण संपूर्ण देशासाठी एकच वेळ असणं ही अनेकांच्या मते चुकीची कल्पना आहे.
भारत पूर्वेकडून पश्चिमेकडे पसरला आहे. हे अंतर सुमारे 3 हजार किलोमीटर आहे. त्यादरम्यान 30 अंश रेखावृत्त जातात. त्यामुळे अरुणाचल प्रदेश आणि गुजरात दरम्यान सरासरी वेळेत दोन तासांचा फरक पडतो.सूर्योदय आणि सूर्यास्ताचा आपल्या शरीराच्या घड्याळावरही परिणाम होत असतो. सूर्यास्त होऊ लागला की आपलं शरीर झोप लागणारं हार्मोन म्हणजे मेलॅटोनिन निर्माण करतं. त्यामुळे आपल्याला झोप यायला लागते. कॉर्नेल युनिव्हर्सिटी येथील प्रा. मौलिक जग्नानी यांच्या मते, एका प्रमाण वेळेचा विशेषत: गरीब घरातल्या मुलांच्या झोपेवर वाईट परिणाम होतो. कमी झोप मिळाल्याने त्यांच्या अभ्यासावरही परिणाम होत असतो.


Swiggy [CPS] IN

पूर्व भारतात पश्चिम भारतापेक्षा दोन तास आधी सूर्योदय होतो. सरकारने दोन भारतीय वेळा निश्चित कराव्यात, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. पूर्व भारतासाठी वेगळी वेळ निश्चित केली तर अधिकचा वेळ उपयोगात आणता येईल. कारण त्याठिकाणी 2 तास आधी सूर्योदय आणि 2 तास लवकर सूर्यास्त होतो.
पूर्व आणि पश्चिम भागातील वार्षिक सरासरी सूर्यास्ताच्या वेळेचा मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर परिणाम होत असतो. सूर्यास्त एक तास उशीरा होत असेल तर त्या ठिकाणच्या मुलांच्या शिक्षणात 0.8 वर्षांनी घट होते. प्राथमिक आणि माध्यमिक शाळेत ते चांगली प्रगती करु शकत नाहीत, असं अभ्यासात दिसून आलं आहे.
भारताने दोन प्रमाण वेळा निश्चित केल्या तर देशाच्या GDP मध्ये साधारण 0.2 % चा फायदा होईल. पश्चिम भारतासाठी UTC+5 तर पूर्व भारतासाठी UTC+6 करावी असं सुचवण्यात आलं आहे.
भारतात दोन प्रमाण वेळा असाव्यात यावर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आसाममधल्या चहाचे मळे पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी तर अनौपचारिक पातळीवर त्यांचं घड्याळ हे भारतीय वेळेपेक्षा एक तास आधी करून घेतलं आहे.
1980मध्ये वीज वाचवण्यासाठी एका नामांकित उर्जा संशोधन संस्थेनं एक प्रस्ताव मांडला होता. पण प्रस्ताव किचकट असल्याचं कारण देत 2002मध्ये तो फेटाळण्यात आला. दोन प्रमाण वेळांमुळे रेल्वे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याचं सांगण्यात आलं.
पण, गेल्यावर्षी राष्ट्रीय भौगोलिक प्रयोगशाळेनंच दोन प्रमाणवेळेचा प्रस्ताव सरकारला दिला आहे. यामध्ये बहुतेक राज्यांसाठी एक प्रमाण वेळ तर ठराविक 8 राज्यासांठी दुसरी प्रमाणवेळ सुचवण्यात आली आहे. त्यामध्ये 7 ईशान्य भारतातली राज्ये आहेत. या दोन प्रमाणवेळेत एक तासाचा फरक राहील.
प्रयोगशाळेच्या मते, सूर्यास्त आणि सूर्योदय हे भारतीय प्रमाणवेळेच्या आधीच होत असल्यानं लोकांच्या जीवनमानावर वाईट परिणाम होत आहे.
सूर्योदय लवकर झाला तरी सरकारी ऑफिस, शाळा, कॉलेज उशीरा सुरु होतात. त्यामुळे दिवसाच्या वेळेचा पूर्ण वापर करता येत नाही. हिवाळ्यात तर आणखी बिकट परिस्थिती होते. कारण सूर्य नेहमीपेक्षा अधिक लवकर मावळतो. त्यामुळे दिवसभराचं काम चालू ठेवण्यासाठी लवकर लाईट लावावी लागते.
या सगळ्या घटनेचा अर्थ एकच होतो की, झोपेचा आपल्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, विचित्र प्रमाण वेळेचा लोकांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. त्यामध्ये गरीब घरातली मुलं जास्त बळी पडतात.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *