578798e991470a3e9e599dd85652eef5

पुण्यात सुशिक्षित तरुण-तरुणींवर उपोषणाची वेळ का आली ?

महाराष्ट्र शिक्षण

पुणे प्रतिनिधी : पुण्यात अनेक इंजिनीयरिंग झालेले विद्यार्थी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चहाचे स्टॉल लावून, केळीचा गाडा लावून बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करत आहेत.”कर्ज काढून सिव्हिल इंजिनीयरिंग केलं. डिग्री असूनही सरळसेवा भरतीत मी अर्ज करू शकत नाही, कारण 48 वर्षांपूर्वी काढलेल्या शासन निर्णयामुळे केवळ डिप्लोमा झालेले विद्यार्थीच गट ‘ब’ साठी सरळसेवेत घेतले जातात.


Netmeds [CPS] IN

स्वप्नील खेडकर हा 2015 साली नवसह्याद्री कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून BE(Civil) पास झाला. पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. तीन वर्षांपासून MPSCच्या परीक्षेत यश हुलकावणी देतंय.सिव्हिल इंजिनीयरिंगची पदवी असल्याने तो सरळसेवेत अर्ज करू शकत नाही. तर खासगी क्षेत्रात संधी नाहीत. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून तो बेरोजगार आहे.स्वप्नील खेडकर प्रमाणेच रुपेश चोपणे, गणेश साळुंखे आणि इतर सिव्हिल इंजिनीयर देखील पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत.
सरळसेवा भरतीसाठी केवळ डिप्लोमा असणारेच का? डिग्रीची पदवी असताना देखील का डावललं जातं? असे प्रश्न विचारत काही सिव्हिल इंजिनियरिंग केलेली मुलं गेल्या महिनाभरापासून पुणे आणि मुंबईमध्ये आंदोलन करत आहेत.
बेरोजगारीचा भीषण प्रश्न सोडवण्यासाठी मेगा भरतीतून सरळसेवेद्वारे सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभागात 2, 157 गट ‘ब’ कनिष्ठ अभियंता पदांसाठी जाहिरात काढण्यात आली. यामध्ये सिव्हिल इंजिनीयर झालेल्या तरुणांनादेखील सामावून घेतल जावं अशी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची मागणी आहे.राज्य सरकारचं लक्ष वेधून घेण्यासाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी पुण्यात विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चहा आणि केळी विकून निषेध नोंदवला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *