convocation-st-philomena-college

देशातील ‘आयआयटी’,’एनआयटी’ व ‘आयआयएम’ प्रवेश क्षमतेत २५ टक्‍क्‍यांनी वाढ

देश शिक्षण

मुंबई प्रतिनिधी : राज्यातील खुल्या गटातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाचा मार्ग सुकर झाला आहे. खुल्या गटातील दहा टक्के आरक्षणामुळे देशातील केंद्रीय शिक्षण संस्थांमधील प्रवेश क्षमता २५ टक्‍क्‍यांनी वाढली आहे. मूळच्या जागांना कोणताही धक्का न लावता खुल्या गटाला आरक्षण दिल्याने क्षमतेत ही वाढ झाली आहे. या निर्णयामुळे ‘आयआयटी’,’एनआयटी’ व ‘आयआयएम’मधील प्रवेश क्षमता १५ हजारांनी वाढेल, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह देशातील इतर केंद्रीय संस्थांमध्ये तब्बल दोन लाख १५ हजार ४६० जागांची वाढ होणार आहे.


MMT - DF [CPS] IN

केंद्राच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थांमध्ये प्रवेश क्षमता वाढणार असल्याने ‘आयआयटी’मधील प्रवेश क्षमता ६७०८, ‘एनआयटी’मधील ७२५६, तसेच ‘आयआयएम’मधील प्रवेश क्षमता १३६३ ने वाढणार आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या तिजोरीवर पाच हजार ६७६ कोटी रुपयांचा बोजा पडणार आहे. या संदर्भात केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी संपर्क साधला असता. येत्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून, देशाच्या उच्च शिक्षणक्षेत्रातील हा एक मोठा निर्णय असल्याचे जावडेकर यांनी सांगितले.
प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय विद्यार्थीकेंद्रित आहे. खुल्या गटातील आरक्षणामुळे थेट २५ टक्के जागा वाढणार असल्याने या गटातील विद्यार्थ्यांना अधिकची संधी मिळणार आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *