अध्यापक_2803

शिक्षण आयुक्‍तांची नवी घोषणा, 11 हजार जागा भरल्या जाणार

महाराष्ट्र शिक्षण

पुणे प्रतिनिधी – राज्य शासनाच्या वतीने ‘पवित्र’ पोर्टलद्वारे प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी केवळ 11 हजार शिक्षक भरतीच्या जागांसाठी पुढील आठवड्यात जाहिरात काढण्यात येणार आहे.
राज्यातील 20 जिल्ह्यामधील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या बिंदूनामावली तपासून तयार झाल्या आहेत. त्या पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याचे कामही सुरू आहे. प्राथमिक शाळांमधील 8 हजार 500 व माध्यमिक शाळांमधील 2 हजार 500 शिक्षकांच्या पदांसाठी आता लवकरच जाहिरात काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे सोळंकी यांनी जाहीर केले आहे.


Flipkart [CPS] IN

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी अगदी सुरुवातीला 24 हजार शिक्षकांची भरती पारदर्शकपणे करण्याची घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात विविध कारणांमुळे भरतीच्या जागांची संख्या कमी होत चालली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक भरतीवरून आता वादही उफाळू लागले आहेत. सर्वाधिक शिक्षक भरतीच्या जागा जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्‍त आहेत. भरतीच्या जाहिराती 3 फेब्रुवारी, 12 फेब्रुवारीला काढण्याच्या घोषणा शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही.
शिक्षक भरतीच्या जाहिराती अद्याप प्रसिद्ध न झाल्याने डी.टी.एड्‌., बी.एड्‌. स्टुडंट असोसिएशनच्या वतीने गेल्या सोमवारपासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. यातील उमेदवारांची प्रकृती सतत खालावत चालली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरू असतात. उपचार झाल्यानंतर या उमेदवारांनी पुन्हा आंदोलन सुरूच ठेवले आहे. शिक्षक भरतीच्या जाहिराती त्वरित काढा, असा आग्रह त्यांनी शिक्षण आयुक्‍तांकडे धरला. आयुक्‍तांनीही त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *