a29e3af49b1ac8a85bd0dda7bb135d63

CBI चे माजी हंगामी संचालक एम.नागेश्वर राव यांना कोर्टाचं कामकाज संपेपर्यंत कोर्टाच्या एका कोपऱ्यात बसण्याची शिक्षा

देश

प्रतिनिधी : सीबीआयचे माजी हंगामी संचालक नागेश्वर राव बिहारच्या मुजफ्फरपूर बालिका गृह प्रकरणाचे तपास अधिकारी ए. के. शर्मा यांची तडकाफडकी बदली केल्याप्रकरणी दोषी असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून न्यायालयाचा नागेश्वर राव यांनी अवमान केला आहे. त्यांना यासाठी १ लाख रुपयांचा दंड आणि त्यांना न्यायालयाची वेळ संपेपर्यंत दिवसभर न्यायालयातील कोपऱ्यात बसून राहण्याची शिक्षा देण्यात येत असल्याचा निर्णय सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिला आहे.


TVC-mall WW

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय अन्वेषण विभागाचे (सीबीआय) माजी हंगामी संचालक नागेश्वर राव यांना अवमान नोटीस बजावली होती. त्यांना आज न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. पण त्यांनी त्यापूर्वीच न्यायालयाची लिखित स्वरूपात माफी मागितली होती.महाधिवक्त्यांनी संयुक्त संचालक अरुण कुमार शर्मा यांच्या बदलीचा आदेश वाचला. त्यांनी पुढे असंही सांगितलं की शर्मा यांनी केंद्रीय सशस्त्र दलात बढतीवर पाठवण्यात आलं आहे. या सगळ्या प्रकरणात अनेक चुका होत्या असंही त्यांनी मान्य केलं. त्यांनी कोर्टाची बिनशर्त माफी मागितली. त्यांनी हे जाणूनबुजून केलं नाही असंही सांगितलं.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *