sharabi_1478090638

विषारी दारू प्यायल्याने 109 जणांचा मृत्यू

देश

प्रतिनिधी : उत्तर प्रदेशातील सहारनपूर आणि उत्तराखंड हरिद्वार मध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत 109 जणांचा मृत्यू झाला आहे. हरिद्वारच्या बालूपूरमध्ये हे सर्व दारू प्यायले होते. मृत व्यक्ती हे बालूपूर आणि सहारनपूर या ठिकाणचे रहिवासी आहेत. तर मेरठ, सहारनपूर, डेहराडून या ठिकाणच्या रुग्णालयातील 90 पेक्षा जास्त रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.


Netmeds [CPS] IN

दारूमुळे लोक मरत असताना जिल्हा प्रशासन मात्र, मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे आकडे लपवत आहे. एवढी मोठी घटना घडली असताना सुद्धा प्रशासनाला अजूनपर्यंत विषारी दारू तयार करणार्‍या आरोपीला पकडण्यात यश आलेले नाही. त्यामुळे राज्यात दारूचा कारभार हा पोलिसांच्या सहकार्यांने चालू असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.
मृतांचा आकडा शंभरच्या वर गेल्याने योगी सरकार खडबडून जागे झाले आहे. अवैधरित्या दारु विकणार्‍यांविरोधात 15 दिवसांची कडक मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. सहारनपूरमध्ये आतापर्यंत 39 जणांना अटक केली आहे. तर 35 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आतापर्यंत 297 गुन्हे दाखल झाले असून 175 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *