images_1521279663629_Raj_Thakrey_and_Sharad_Pawar

मनसेचे महाआघाडीतील स्थान नाकारलं, राज ठाकरेची कृष्णकुंजवर नेत्यांसोबत बैठक

महाराष्ट्र राजकीय

मुंबई प्रतिनिधी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांची बैठक बोलावली असून मनसे नेते आणि पदाधिकारी बैठकीला उपस्थित आहेत. निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नसल्याचे सांगत मनसेला महाआघाडीमध्ये स्थान नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. याच पार्श्वभूमीवर पर्यायांचा विचार करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.


MMT - DF [CPS] IN

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जवळीक वाढते आहे का? असे वाटत असतानाच निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही असे शरद पवारांनी म्हटले. महाआघाडीमध्ये मनसेला स्थान नसल्याचे खुद्द शरद पवारांनीच सांगितल्याने मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा पडला आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *