17lasalgav1_201812171254

रायगड जिल्ह्यात नीचांकी तापमानाची नोंद, रविवारी पारा ११.२ अंश सेल्सिअस

कोकण महाराष्ट्र

अलिबाग प्रतिनिधी :- रायगड जिल्ह्यातील पारा कमालीचा घसरल्याने नागरिक उबदार कपडे घालून बाहेर पडत आहेत. मागील चार दिवसांपासून जिल्ह्याच्या तापमानात सातत्याने घट होत आहे. रायगडमध्ये या मोसमातील हे सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
रविवारी सकाळी जिल्ह्यात ११.२ अंश इतक्या तापमानाची नोंद झाली. आणखी काही दिवस हि थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


TVC-mall WW

उत्तरेत होत असलेल्या बर्फवृष्टीबरोबरच राज्यातील कोरडया हवामानामुळे उत्तरेच्या वाऱ्यांचा जोर पुन्हा वाढल्याने राज्यात थंडीची लाट आली आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून बोचऱ्या थंडीचा सामना रायगडकरांना करावा लागत आहे. रविवारी रायगडमध्ये सर्वात कमी नीचांकी ११.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *