smartphone-on-fire--784x441

मोबाईलचा स्फोट, चिमुकल्याने गमावली बोटे

महाराष्ट्र

प्रतिनिधी : नांदेड येथे ऑनलाइन मागविलेल्या मोबाइलवर गेम खेळत असताना अचानक स्फोट होऊन आठ वर्षांच्या मुलाच्या हाताची पाचही बोटे तुटल्याची घटना मुखेड तालुक्यातील जिरगा येथे घडली. गेम खेळताना मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे नांदेड येथील चिमुकल्याला आपला हात गमवावा लागला. प्रशांत जाधव वय 8 असे त्या मुलाचे नाव आहे.


Netmeds [CPS] IN

प्रशांत यांच्या वडिलांनी दिड महिन्यापूर्वी ऑनलाईन मोबाईल ची खरेदी केली होती. पंधराशे रुपयाला तीन मोबाईल आणि एक घड्याळ असा त्या स्कीमचा समावेश होता त्यांचा मुलगा गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला.या स्फोटात त्याच्या डाव्या हाताच्या तळव्यासह पाचही बोटे तुटून पडले आहेत. तसेच त्याच्या छातीत पोटात मोबाईल चे तुकडे घुसून मोठी दुखापत झाली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *