cst1

मुंबईचा हिंदी भाषिक शहर बनण्याच्या दिशेने प्रवास

मुंबई

मुंबई प्रतिनिधी :- मुंबईत वेगवेगळया भाषा बोलल्या जात असल्या तरी मराठी भाषा ही मुंबईची मुख्य ओळख आहे. पण मागच्या काही वर्षात स्थलांतरामुळे मुंबईच्या लोकसंख्येमध्ये बदल होत आहेत. त्यामुळे मराठी मुंबईचा हळूहळू हिंदी भाषिकांचे शहर बनण्याच्या दिशेने प्रवास सुरु आहे.मुंबईमध्ये महाराष्ट्राच्या अन्य भागातून नागरिक येऊन स्थायिक झाले. ज्यातील बहुसंख्याची बोलीभाषा मराठीच होती. पण मिलमधील नोकऱ्या कमी झाल्यानंतर मुंबईत उत्तर प्रदेश, बिहारमधून स्थलांतर वाढले. अत्यंत स्वस्तात हा कामगार उपलब्ध झाला.


TVC-mall WW

मातृभाषे संदर्भातला २०११ सालचा जनगणनेचा जो अहवाल आहे त्यानुसार मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या ४० टक्क्यांनी वाढली आहे. २००१ साली मुंबईत हिंदी मातृभाषिकांची संख्या २५.८८ लाख होती. २०११ मध्ये हेच प्रमाण ३५.९८ लाख झाले. त्याचवेळी मराठी मातृभाषिकांच्या संख्येत २.६४ टक्के घट झाली. २००१ साली ४५.२३ लाख लोकांनी मराठी मातृभाषा असल्याचे सांगितले होते. २०११ मध्ये हेच प्रमाण ४४.०४ लाख झाले.
मुंबईच्या शेजारी असलेल्या ठाणे आणि रायगडमध्येही लोकसंख्येतील हे बदल दिसून येतात. ठाणे, रायगडमध्ये हिंदी भाषिकांच्या संख्येत तब्बल ८० टक्के वाढ झाली आहे. बदलत्या लोकसंख्येमुळे सरकारच्या फक्त नियोजन आणि धोरणांमध्येच बदल होत नाहीय तर या भागात नवीन राजकारणही आकाराला येत आहे. स्थानिक विरुद्ध परप्रांतीय हा संघर्ष मुंबईने अनेकदा अनुभवला आहे.
२०११ मध्ये हे प्रमाण १४.५९ लाख झाले. फक्त हिंदी भाषिकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली. २५.८२ लाखावरुन हिंदी मातृ भाषा आहे सांगणाऱ्यांची संख्या ३५.९८ लाख झाली. ३९.३५ टक्के ही वाढ आहे. कुटुंब विस्तार आणि मुंबईत वाढलेल्या जागांच्या किंमतीमुळे मूळ मराठी भाषिक मुंबईकर ठाणे आणि रायगड जिल्ह्यात वास्तव्याला गेला. पण तिथेही हिंदी भाषिकांची संख्या झपाटयाने वाढली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *