Abu-Dhabi

अरबी, इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीत हिंदी कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा

देश विदेश

प्रतिनिधी : अरबी आणि इंग्रजी भाषेनंतर अबुधाबीने हिंदी भाषेचा कोर्टाची तिसरी अधिकृत भाषा म्हणून समावेश केला आहे. लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण अबुधाबीमध्ये हिंदी भाषिकांची संख्या खूप मोठी आहे.
अबुधाबीच्या न्याय विभागाने (एडीजेडी) शनिवारी म्हटले की, नोकरीच्या प्रकरणांमध्ये अरबी आणि इंग्रजीसोबतच हिंदी भाषेचा समावेश करीत कोर्टासमोर येणाऱ्या याचिकांवर सुनावणी होण्यासाठी भाषेच्या माध्यमाचा विस्तार केला आहे.


TVC-mall WW

हिंदी भाषिक लोकांना खटल्याची प्रक्रिया, त्यांचे अधिकार आणि कर्तव्यांबाबत माहिती मिळण्यास मदद व्हावी हा या मागचा हेतू आहे.
संयुक्त अरब अमिरातीच्या लोकसंख्येत सुमारे दोन तृतीयांश लोकसंख्या ही परदेशी प्रवाशी लोकांची संख्या आहे. इथे भारतीयांची लोकसंख्या २६ लाख आहे. ही लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के आहे. अबुधाबीतील हा सर्वांत मोठा प्रवासी समाज आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *