six-seater

धरमतर पुलाजवळ मिनीडोअर चालकांचे जलसमाधी आंदोलन

कोकण महाराष्ट्र

अलिबाग प्रतिनिधी :-मिनीडोअर चालक व मालक येत्या १२ फेब्रुवारी रोजी धरमतर पुलावर सकाळी ११ वाजता सामूहिक जलसमाधी घेणार आहेत. रायगड जिल्ह्यातील मिनीडोअर चालक मालकांच्या मागण्यांसाठी धरमतर पुलाजवळ जलसमाधी आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अलिबाग -रेवस, अलिबाग -पेण, अलिबाग -पनवेल,अलिबाग -रेवदंडा,अलिबाग -पोयनाड,वावे -सुडकोली,सुडकोळी – रोहा,रोहा -चणेरा,चणेरा – रेवदंडा,मुरुड -रेवदंडा, माणगांव,महाड,कर्जत, खालापूर,श्रीवर्धन अशा अनेक मार्गावरील मिनीडोअर वाहतूकमंगळवारी बंद करण्यात येणार आहे.


MMT - DF [CPS] IN

परिवहन विभागाने विक्रमी मिनीडोअर गाड्यांसाठी वीस वर्षावरुन सोळा वर्षाची वयोमर्यादा ठेवल्याने रायगड जिल्ह्यातील ७० % मिनीडोअर मोडून टाकाव्या लागणार आहेत. शासनाच्या या जाचक अटींमुळे ग्रामीण भागातील मिनीडोअर व्यवसायासह चालक व मालकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *