753699-winter-dna

थंडीचा कहर ! मुंबईत दहा वर्षांतील सर्वात कमी कमाल तापमानाची आकडेवारी

मुंबई

मुंबई प्रतिनिधी : मुंबई शहरात शुक्रवारी कमाल तापमानाचा पारा २४ अंश सेल्सियसपर्यंत खाली असल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे.गेल्या दहा वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रथमच तापमानाचा पारा इतका खाली गेला आहे. सरासरीपेक्षा कमाल तापमानात जवळपास सहा अंश से.ने घट झाली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात घट झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. पुढील दोन दिवस कमाल तापमानासह किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे.


MMT - DF [CPS] IN

गेल्या आठवडय़ात शहरातील कमाल तापमानाचा पारा ३५ अंश से.पर्यंत चढल्याने उन्हाळा परततोय का, या चिंतेच्या झळा लागल्या होत्या. परंतु सोमवारपासून तापमानाचा पारा घसरायला सुरुवात झाली. शुक्रवारी दुपारीदेखील थंड वारे वाहात होते. त्यामुळे दुपारपासूनच हवेत चांगलाच गारवा जाणवत होता. शुक्रवारी सांताक्रूझ येथे २४.२ अंश से. कमाल तापामान नोंदले गेले, तर कुलाबा येथे २४.५ अंश से. नोंद झाली आहे. सांताक्रूझ येथे ६.९ अंश से.ने कमाल तापमानात घट झाली आहे, तर कुलाबा येथे ५.४ अंश से.ने तापमान कमी झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. गेल्या चार दिवसांत शहरासह उपनगरांमध्येही तापमान घट झाल्याने थंडी पुन्हा अवतरली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *