689198-train-mumbai

उद्या हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई

मुंबई प्रतिनिधी : मध्य रेल्वेच्या मार्गावरील दुरुस्ती कामांसाठी हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यावेळी पश्चिम मार्गावर आणि मध्य मार्गावर मेगा ब्लॉक नाही.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी, वांद्रे डाऊन हार्बर सेवा सकाळी ११.४० पासून ते दुपारी ४.१० पर्यंत लोकल वाहतूक सेवा बंद राहील. चुनाभट्टी आणि वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत बंद राहील.


Flipkart [CPS] IN

सकाळी ११.३४ पासून सायंकाळी ४.२३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर, पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.
तसेच सकाळी ९.५६ ते सायंकाळी ४.१६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून वांद्रे, गोरेगावसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर लोकल गाडय़ा बंद राहतील
ब्लॉकच्या दरम्यान पनवेल आणि कुर्ला स्थानकातून विशेष गाडय़ा प्लॅटफॉर्म क्रमांक आठवरून सोडण्यात येतील.हार्बर लाइनच्या प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ दरम्यान मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेच्या स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *