Helipad_3

राज्यात 10 ठिकाणी हेलिपॅड उभारण्याचे नियोजन

महाराष्ट्र व्यापार

सोलापूर प्रतिनिधी : विविध कार्यक्रमानिमित्त अथवा इमरजन्सी लॅंडिंग करण्याकरिता हेलिकॉफ्टरसाठी जागा मिळत नाही. त्या पार्श्‍वभूमीवर विमानसेवा नसलेल्या जिल्ह्यात 100 किलोमीटर परिसरात तर औद्योगिक क्षेत्रात 50 किलोमीटर परिसरात हेलिपॅड उभारण्याचे नियोजन केल्याची माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष सुरेश काकाणी यांनी सांगितली.


Netmeds [CPS] IN

जालना, बीड, नंदूरबार, वाशिम, बुलढाणा, रायगड या जिल्ह्यांच्या ठिकाणी तर उर्वरित चार हेलिपॅड रायगड, मुंबई, ठाणे व पुणे येथील औद्योगिक क्षेत्रात उभारले जाणार आहेत. विमानसेवा सुरळीत नसलेल्या अथवा विमानसेवाच नाही, अशा भागात हेलिपॅड उभारण्याला प्राधान्य देण्यात आले असून त्यासाठी जिल्ह्याच्या मध्यवर्ती जागांची पाहणी करण्यात आली आहे. त्याच्या भाड्यातून प्राधिकरणाला फायदा होईल, असे काकाणी यांनी सांगितले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *