liquor-1440x564_c

विषारी दारूचे तीन राज्यात थैमान

देश

प्रतिनिधी :- उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंड या तीन राज्यात विषारी दारूने थैमान घातले आहे. विषारी दारू पिऊन तीन राज्यांत वेगवेगळ्या ठिकाणी आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दारूकांडातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून बिहार आणि उत्तराखंड सरकारनी देखील चौकशीचे आदेश दिले आहेत.


Netmeds [CPS] IN

विषारी दारूने मृत्यू होण्याची सुरुवात उत्तर प्रदेशातल्या सहारनपूर जिल्ह्यातील देवबंदमधून झाली. देवबंद येथे विषारी दारूने 5 जणांचा बळी घेतला तर,कुशीनगरमध्ये विषारी दारू प्यायल्याने दोन दिवसांत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर संपूर्ण जिल्ह्याती आतापर्यंत एकुण 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर तसेच दुसरीकडे उत्तराखंडात देखील विषारी दारू प्यायल्याने दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी आहेत.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *