Wellington:  India's MS Dhoni, right, plays in front of New Zealand's Tim Seifert during the twenty/20 cricket international between New Zealand and India in Wellington, New Zealand, Wednesday, Feb. 6, 2019. AP/PTI(AP2_6_2019_000162B)

NZvIND 2nd T20 : भारताचा न्यूझीलंडवर ७ गडी राखून विजय

क्रीडा

मुंबई प्रतिनिधी :- भारताचा न्यूझीलंडवर  ७ गडी राखून विजय झाला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना १५८ धावा केल्या होत्या. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने या आव्हानाचा सहज पाठलाग केला. रोहित शर्मा आणि रिषभ पंत यांच्या फंदाजीच्या जोरावर भारताने टी-२० मालिकेत १-१ ने बरोबरी केली. न्यूझीलंडने भारतीय संघासमोर विजयासाठी १५९ धावांचे आव्हान ठेवले होते.
Netmeds [CPS] IN

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद १५८ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या सुरूवातीच्या चार विकेटस झटपट गेल्या, त्यामुळे ७.५ षटकांत त्यांची ४ बाद ५० अशी अवस्था होती. मात्र त्यानंतर आलेल्या राॅस टेलर आणि काॅलिन डी ग्रैंडहोम यांच्या ७७ धावांच्या भागिदारीमुळे न्यूझीलंडचा संघ भारतासमोर १५९ धावांचे आव्हान उभ करू शकला.
भारताकडून गोलंदाजीत क्रुणाल पांड्याने ४ षटकांत २८ धावा देत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर खलील अहमदने २ आणि भुवनेश्वर कुमार व हार्दिक पांड्याने प्रत्येकी १ गडी बाद केला.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *