download

विदर्भ संघाच्या हातात सलग दुसऱ्यांदा रणजी करंडक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले संघाचे अभिनंदन

क्रीडा

मुंबई प्रतिनिधी :- विदर्भ आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये विदर्भाने नाणेफेक जिंकत आधी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. विदर्भाच्या संघाने रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सौराष्ट्रचा 78 धावांनी पराभव करत इतिहास घडवला आहे. सामन्यात एकूण 11 बळी घेणारा आणि दुसऱ्या डावात महत्वपूर्ण 49 धावा करणारा आदित्य सरवटे हा सामनावीर ठरला आहे.


Flipkart [CPS] IN

विजयासाठी सौराष्ट्र संघासमोर 206 धावांचे आव्हान होते, मात्र त्यांचा संपूर्ण संघ 58.4 षटकांत 127 धावांपर्यतच मजल मारू शकला. फिरकीपटू आदित्य सरवटे यांने विदर्भाच्या विजयात महत्वपूर्ण कामगिरी बजावली. आदित्य सरवटे यांने पहिल्या डावात 5 आणि दुसऱ्या डावात 6 असे 11 गडी बाद केले.
सामन्यात विदर्भाच्या संघाने पहिल्या डावात 312 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात सौराष्ट्रने पहिल्या डावात 307 धावांपर्यत मजल मारली होती. दुसऱ्या डावात विदर्भाने सर्वबाद 200 धावा करत सौराष्ट्रसमोर 206 धावांचे लक्ष्य ठेवले होते, मात्र आदित्य सरवटेच्या गोलंदाजीसमोर त्यांचा डावा 127 वरच आटोपला.
या विजयानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून विदर्भाच्या संघाचे अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विट करताना म्हटले आहे की, ‘रणजी ट्रॉफी 2018-19 चे विजेतेपद पटकावून सलग दुसऱ्यांदा रणजी ट्रॉफी जिंकण्याबदल विदर्भ संघाचे अभिनंदन’. तुमच्या संघाचा मला अभिमान आहे.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *