ROPAX-FERRY-CREW-PASSENGER-LCT-VESSEL

भाऊचा धक्का-मांडवा ‘रॉ पेक्स’ सेवा,नवी मुंबई विमानतळाला जोडण्याचा बीपीटी प्रशासनाचा विचार

कोकण मुंबई

मुंबई प्रतिनिधी :- ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ (बीपीटी)तर्फे भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर प्रायोगिक वाहतुकीसाठी ‘रॉ-पेक्स’ या अजस्र जहाजाची खरेदी केली जाणार आहे. यासाठी ‘जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट’ (जेएनपीटी), ‘महाराष्ट्र सागरी महामंडळ’ (एमएमबी) आणि ‘शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ’ (सिडको) प्रत्येकी १० कोटी रुपयांचे आर्थिक साहाय्य करतील.


Netmeds [CPS] IN

या सेवाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यास पुढे ती नवी मुंबई विमानतळाला जोडण्याचा बीपीटी प्रशासनाचा विचार आहे. या जहाजातून सुमारे ८० गाडय़ा आणि २०० प्रवासी एकाच वेळी प्रवास करू शकतील.
रस्ते वाहतुकीमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जल वाहतुकीला प्राधान्य देणारे प्रकल्प ‘बीपीटी’ने आखले आहेत. याअंतर्गत आता ‘रॉ-पेक्स’ जहाजाची खरेदी पोर्ट ट्रस्ट प्रशासनाकडून करण्यात येणार आहे.
भाऊचा धक्का ते मांडवा या जलमार्गावर प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात येईल. ‘बीपीटी’ने दिलेल्या माहितीनुसार सध्या भाऊचा धक्का ते मांडवा जलमार्गावरील फेरी सेवेचा लाभ दरवर्षी १४ लाख प्रवासी घेतात. या जलमार्गाची क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने ‘रॉ-पेक्स’ सेवा सुरू करण्यात येणार आहे. या जहाजात १० बस, ५० ते ६० गाडय़ा आणि २०० प्रवासी सामावून घेता येतील.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *