34b383aff1d165e4a11b283ed5ecdc24

मस्ती करते, चिमुकलीला दिले आईने मेणबत्तीचे चटके

मुंबई

पनवेल प्रतिनिधी :- घरात लहान मुले असली की ती दंगा-मस्ती करतातच. अशावेळी पालक मुलांवर ओरडतात.परंतु दंगा-मस्ती करते म्हणुन आईने व चुलतीने आपल्या चिमुकलीला मेणबत्तीचे चटके दिल्याची घटना कळंबोली वसाहतीत घडली.साक्षी असे या मुलीचे नाव आहे.याबाबत कळंबोली पोलिस ठाण्यात मुलीच्या वडिलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, या दोघींना गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. कळंबोली वसाहतीत राहणाऱ्या साक्षी यादव या पाच वर्षीय मुलीसोबत ही घटना घडली.


MMT - DF [CPS] IN

साक्षीचे वडील घनश्याम यादव हे भाजीचा व्यवसाय करतात. मुलिबरोबर घडलेली घटना लक्षात येताच यादव यांनी कळंबोली पोलिस ठाणे गाठत पत्नी व भावजयी विरोधात तक्रार केल्याने वरिष्ठ पोलिस निरिक्षक सतीश गायकवाड यांनी तात्काळ अधिनीयम २००० चे कलम ७५ अन्वये गुन्हा केला.
संबंधित मुलगी बुधवारी संध्याकाळी घरात दंगा-मस्ती करीत होती. त्यावेळी आईने सुरुवातीला तिला शांत बसण्यास सांगितले. पण तिने त्याकडे दुर्लक्ष करीत आपला दंगा सुरूच ठेवला. यानंतर चिडलेल्या आईने मुलीच्या काकूच्या मदतीने तिला पेटत्या मेणबत्तीचे चटके दिले. हे सगळे घडल्यावर मुलगी एकदम शांत झाली. तिला वेदना असह्य होऊ लागल्याने ती रडू लागली. त्यानंतर वडील घरी आल्यावर तिने वडिलांना सगळा प्रकार सांगितला. मुलीच्या अंगावरील चटक्यांचे व्रण बघितल्यावर वडिलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *