Samba: Prime Minister Narender Modi addresses during a public rally after laying the foundation stone of AIIMS and Jammu-Akhnoor four-lane Highway during his visit at Vijay Pur in Samba district of Jammu and Kashmir, Sunday, Feb. 03, 2019. (PTI Photo)(PTI2_3_2019_000099A)

जम्मू काश्मीरमध्ये नवीन पाच वैद्यकीय महाविद्यालये उभारणार- पंतप्रधान नरेंद्र मोदी

देश शिक्षण

प्रतिनिधी :-जम्मू काश्मीरमध्ये नवीन पाच वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यासाठी केंद्र शासनाने ७५० कोटी रुपयांची तरतूद केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. पंतप्रधानांच्या हस्ते रविवारी येथील विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन करण्यात आले.


Flipkart [CPS] IN

जम्मू परिसरात सुसज्ज एम्स रुग्णालयाची सुविधा निर्माण व्हावी, यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक रहिवासी आंदोलन करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर रविवारच्या सोहळ्यात पंतप्रधानांनी सुसज्ज रुग्णालयामध्ये जम्मूवासीयांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा मिळतील, असे सांगितले. या प्रस्तावित रुग्णालयात ७०० खाटांची सुविधा असणार आहे. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मास कम्युनिकेशनच्या उत्तर विभागीय केंद्राचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *