92c55-15490525959450-800

आयसीसी एक दिवसीय क्रमवारीत टीम इंडियाची दुसऱ्या स्थानी झेप

क्रीडा

प्रतिनिधी :- न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत टीम इंडियाने 4-1 असा दणदणीत विजय मिळवला. या दमदार कामगिरीमुळे टीम इंडिया संघ 122 गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे.


MMT - DF [CPS] IN

पाचव्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 35 धावांनी पराभव केला आणि मालिका 4-1 अशी जिंकली. या विजयामुळे टीम इंडियाला एका स्थानाचा फायदा झाला असून न्यूझीलंडचा संघ चौथ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे समान 111 गुण असले तरी आकडेवारीच्या अनुशंगाने दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली असून त्यांनी तिसरे स्थान पटकावले आहे.

आयसीसी एक दिवसीय क्रमवारी – संघ

1) इंग्लंड – 126 अंक
2) हिंदुस्थान – 122 अंक
3) द.अफ्रीका – 111 अंक (50 मैच)
4) न्यूजीलैंड – 111 अंक (51 मैच)
5) पाकिस्तान – 102 अंक

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *