jnpt-new_201901190426

जेएनपीटीत महाकाय प्रोजेक्टच्या यंत्रसामुग्रीची यशस्वीरित्या हाताळणी

महाराष्ट्र व्यापार

उरण प्रतिनिधी :- जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने निर्यातीसाठी आलेल्या महाकाय प्रोजेक्टच्या यंत्रसामुग्रीची यशस्वीरित्या हाताळणी केली आहे. ही अवजड यंत्रसामुग्री आफ्रिकेतील जीनिया या देशातील खाण विकास आणि निर्यात सुविधांच्या बार्ज लोडींग मशीनची सब असेंब्ली होती.


Flipkart [CPS] IN

पोर्ट अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली जेएनपीटीने ही उपकरणे शॅलो वॉटर बंधवर उभ्या असलेल्या मालवाहतूक जहाज एम व्ही हॅपी स्कायवर ३६ तासात यशस्वीरित्या लोड केली. १,११५ मेट्रिक टन माल व १३२ पॅकेजेस असलेल्या या अवजड कार्गोची ( मुख्य बूम-शटल बूम असेम्ब्ली ) लांबी ६२ मीटर्स व वजन ३८४ टन होते. या संपूर्ण प्रयोगाद्वारे मेक इन इंडिया साठी जेएनपीटीचे हे मोठे योगदान आहे.
जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले अशा महाकाय अवजड कार्गोच्या यशस्वी लोडींग साठी उच्च दर्जाचे कौशल्य आणि तांत्रिक कौशल्य आवश्यक असते जे आमच्या पोर्ट अधिकाऱ्यांनी दाखवून दिले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *