school

कोळेगांव शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

मनोरंजन महाराष्ट्र

कोळेगांव प्रतिनिधी :-जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कोळेगांव, वाघडोह वस्ती,दुपडेवस्ती,बेंदगुडेवस्ती व सरस्वतीनगर या ५ शाळांच्या संयुक्त विद्यमाने कोळेगाव येथे वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी आपली गुणवत्ता टिकवून ठेवली असून स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांमधील कलाकार निर्माण होतो असे मत सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश पाटील यांनी व्यक्त केले.


Flipkart [CPS] IN

व्यासपीठावर पिलीव बिटचे विस्तार अधिकारी महालिंग नकाते,सरपंच परिषदेचे माळशिरस तालुका अध्यक्ष सचिन पाटील,राष्ट्रवादी चे तालुका उपाध्यक्ष अरविंद जाधव,कोळेगाव च्या सरपंच सौ प्रमिला दुपडे,उपसरपंच दत्तात्रय सावंत,पोलीस पाटील बिभीषण दुपडे ,सर्व शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मुख्याध्यापक मुश्ताक जमादार, पल्लवी मेणकर , प्रिया तोरणे, सुरेश कुंभार, बालाजी गळवे, संजय कांबळे ,अनिल भगत , रामभाऊ अडसुळ,नवनाथ धांडोरे, संजय पाटोळे , धनंजय गोडसे यांनी परिश्रम घेतले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *