Roha-Kabaddi

रोहा राष्ट्रीय कबड्डी, महाराष्ट्र उपांत्य फेरीत प्रवेश

कोकण क्रीडा

रोहा प्रतिनिधी:- महाराष्ट्राने उपांत्यपूर्व फेरीत बिहारला ३९-१६ असे नमवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या विजयात अजिंक्य पवारचा झंजावात पाहायला मिळाला. अजिंक्यने १२ चढायांमध्ये १बोनससह ८गुण मिळवले, तर रिशांक देवाडिगाने ८चढायांमध्ये ५ आणि तुषार पाटीलनेही ८चढायांमध्ये ५ गुण पटकावले.


Netmeds [CPS] IN

महाराष्ट्र, बिहार, भारतीय रेल्वे, कर्नाटक यांनी ” ६६व्या पुरुष वरिष्ठ गट” राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठली. रायगड रोहा येथील म्हाडा कॉलनीत सुरू असलेल्या पहिल्या उपउपांत्यपूर्व सामन्यात महाराष्ट्राने केरळचा ५४-३८असा पराभव करीत आगेकूच केली.
दुसऱ्या सामन्यात बिहारने राजस्थानचा प्रतिकार ४५-४४असा मोडून काढत उपांत्यपूर्व फेरी गाठली. मध्यांतराला २३-१९अशी आघाडी बिहारकडे होती. बिहार कडून नवीनने ३४ चढाया करताना ३बोनस सह १९ गुण मिळवीत या विजयात म्हत्वाचे योगदान दिले. राजस्थानकडून सचिनने १७ चढायात ३ बोनस व १२गुण घेत चांगला प्रतिकार केला. इतर सामन्यात कर्नाटकने पोंडेचरिला ६४-२२असे, तर भारतीय रेल्वेने दिल्लीला ५६- ३१असे नमवित आगेकूच केली.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *