1497789302_murud_janjira_sea_fort_murud_in_maharashtra

आज जंजिरा मुक्ती दिन साजरा

क्रीडा

अलिबाग प्रतिनिधी :-आज जंजिरा मुक्ती दिन साजरा झाला आहे. भारतला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले परंतु मुरुड -जंजिरा, श्रीवर्धन आणि म्हसळ्याला मात्र ३१ जानेवारी १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाले. तब्बल साडेपाच महिने प्रतीक्षा करावी लागली. हैद्राबाद संस्थानातील मराठवाड्याला १७ सप्टेंबर १९४८ रोजी स्वातंत्र्य मिळाल्याने शासकीय पातळीवर हा मुक्तीदिन म्हणून पाळला जातो. याच धर्तीवर


Flipkart [CPS] IN

३१ जानेवारी हा दिवस जंजिरा मुक्ती दिन म्हणून शासकीय पातळीवर साजरा करावा अशी मागणी मुरुड तालुका पत्रकार संघ व रायगड प्रेस क्लब व स्थानिक नागरिकांची आहे.
शासकीय पातळीवर हा दिन साजरा होत नसल्याने दरवर्षी या दोन संघटनांकडून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो. ३१ जानेवारी २०१९ रोजी आझाद चौक येथे नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

Share on Social Media
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *