रोहा प्रतिनिधी :-६६ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय पातळीवर खेळलेले कबड्डीपटू ,प्रशिक्षक तसेच आंतरराष्ट्रीय पंच यांचा सत्कार समारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. सहकार्यवाह आस्वाद पाटील,रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू माया आकरे – मेहेर,सदानंद शेटे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू प्रमोद म्हात्रे, आशीष म्हात्रे, एशियन गोल्ड मेडलिस्ट राजू भावसार, जिजामाता पुरस्कार प्राप्त शैलजा जैन,द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त भगवान सिंग, आ. भास्कर जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Share on Social Media